SEE PHOTO: शाहिद कपूरने लेक मीशाचा फोटो पोस्ट केला, मात्र चेहरा लपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 19:56 IST2017-02-07T13:17:22+5:302017-02-07T19:56:36+5:30

31 डिसेंबरला शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर त्याची लाडकी लेक मीशाचे पूर्ण फोटो न टाकता फक्त पायांचा एक फोटो पोस्ट करुन ...

SEE PHOTO: Shahid Kapoor posted a photo of Lake Meisha, but the face was hidden | SEE PHOTO: शाहिद कपूरने लेक मीशाचा फोटो पोस्ट केला, मात्र चेहरा लपवला

SEE PHOTO: शाहिद कपूरने लेक मीशाचा फोटो पोस्ट केला, मात्र चेहरा लपवला

31
िसेंबरला शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर त्याची लाडकी लेक मीशाचे पूर्ण फोटो न टाकता फक्त पायांचा एक फोटो पोस्ट करुन लिहिले होते, 'Mi-shoe'त्या फोटोनंतर शाहिदने पुन्हा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.सूर्यास्ताच्या वेळी काचेच्या पलीकडे उभे राहून शाहिदने हा फोटो काढला असल्यामुळे यात फोटोतही मीशाची छबी स्पष्टपणे दिसत नाहीय. मात्र या फोटो खाली शाहिदने 'सनसेट विथ माय एंजल' असे लिहलं आहे. त्यामुळे शाहिदने त्याच्या मुलीसह हा फोटो काढला असल्याचे कळतेय.  मीशा आता सहा महिन्यांची झाली आहे. 

26 ऑगस्ट 2016ला मीरा राजपूतने मीशाला जन्म दिला होता. आजपर्यंत शाहिदने मीशाला मीडियाच्या कॅमे-यापासून लांब ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद पत्नी मीरा आणि मुलगी मीशासोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यावेळी त्याने  मुलीचा चेहरा मीडियाच्या कॅमे-यात कैद होऊ नये यासाठी  मीशाला कुशीत घेत पुरेपुर काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. काही दिवसांपासून मीशाशी निगडीत अपडेट तो त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकत असतो.शाहिदने त्याच्यापेक्षा वयाने  13 वर्षांनी लहान मीरा राजपूतसोबत जुलै 2015 मध्ये लग्न केले होते. मीशा हे दोघांचे पहिले अपत्य आहे.  

 

Web Title: SEE PHOTO: Shahid Kapoor posted a photo of Lake Meisha, but the face was hidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.