see photo : ​ OMG !! प्रियांका चोप्राने हे काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:52 IST2017-07-26T07:20:37+5:302017-07-26T12:52:52+5:30

‘मिस वर्ल्ड’ हीच केवळ प्रियांका चोप्राची ओळख राहिलेली नाही. आता प्रियांका ग्लोबल स्टार झाली आहे. फॅशन आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये ...

see photo: OMG !! What did Priyanka Chopra do? | see photo : ​ OMG !! प्रियांका चोप्राने हे काय केले?

see photo : ​ OMG !! प्रियांका चोप्राने हे काय केले?

िस वर्ल्ड’ हीच केवळ प्रियांका चोप्राची ओळख राहिलेली नाही. आता प्रियांका ग्लोबल स्टार झाली आहे. फॅशन आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये प्रियांकाने  नेत्रदीपक यश मिळवले. वेळोवेळी तिने या यशाचे पुरावे दिले आहेत. अलीकडे प्रियांकाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात प्रियांका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. ती सुद्धा अतिशय सुंदर. या फोटोतील तिचा ब्लॉन्ड विग तर अप्रतीमच म्हणायला हवा. होय, तिचा ब्लॉन्ड विग. या विगमध्ये  कधी नव्हे अशी प्रियांका  तुम्ही पाहू शकता.





प्रियांकाने याशिवाय आणखी एक फोटो शेअर केला आहे. यात ती ताज्या गुलाब पुष्पांचा सुगंध देताना दिसतेय. साधी, निष्पाप प्रियांका या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. अलीकडे प्रियांकाने आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय केली. मालदिवमध्ये कुटुंबासोबत धम्माल मस्ती करताना ती दिसली. सुट्टी संपली आणि प्रियांका आपल्या कामावर रूजू झाली. सध्या प्रियांका कमालीची बिझी आहे. ‘अ किड लाईक अ जॅक’ आणि ‘इज इन्ट इट रोमॅन्टिक’ हे दोन हॉलिवूड प्रोजेक्ट तिच्या हातात आहे. ‘इज इन्ट इट रोमॅन्टिक’ या चित्रपटात प्रियांका योग दूताची भूमिका साकारणार आहे. यात रिबेल विल्सन, लिआम हेम्सवर्थ, एडम डिवाईन अशी स्टारकास्ट आहे. या रोमॅन्टिक कॉमेडी हॉलिवूडपटाचे शूटींग सुरू झालेय. नुकताच प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. पण तरिही प्रियांकाची घोडदौड थांबलेली नाही. आपल्या आगामी हॉलिवूडपटाकडून प्रियांकाला मोठ्या अपेक्षा आहेत. तिच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते बघूयात.

Web Title: see photo: OMG !! What did Priyanka Chopra do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.