गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:20 PM2024-02-22T17:20:42+5:302024-02-22T17:24:59+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुंबईत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केलं

see inside video of Gauri Khan's 'Tori' restaurant Torii | गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ

गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) एखाद्या राणीपेक्षा कमी नाही. गौरी माध्यमांपासून आणि लाईमलाईटपासून तशी दूर असते.  एक प्रसिद्ध इंटेरिअर डेकोरेटर असण्यासोबतच ती एका वेळी अनेक कंपन्याही सांभाळते. काही दिवसांपुर्वी तिनं मुंबईत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केलं आणि त्याची सर्वत्र एकच चर्चा झाली. याचा एक खास व्हिडीओ गौरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

गौरीने मुंबईतील बांद्राच्या पाली हिल या भागात तिचं रेस्टॉरंट आहे. गौरीचे हे नवीन रेस्टॉरंट खूपच भव्य आणि सुंदर आहे. ज्याचं नाव आहे 'टोरी'. गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या आलिशान रेस्टॉरंटची झलक पाहायला मिळत आहे. गौरीचं रेस्टॉरंट जे बाहेरून आकर्षक दिसतंच, परंतु आतूनही तितकंच भन्नाट आहे.  रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी झाडांच्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या दिसून येत आहेत.

रेस्टॉरंटच्या इंटीरियरवर गौरीने प्रचंड खर्च केलाय. तिच्यासारखंच ग्लॅमरस वातावरण या रेस्टॉरंटमध्ये आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटच्या नावाचा अर्थ होतो 'मंदिराचे प्रवेशद्वार' (टोरी). गौरीने रेस्टॉरंटसाठी प्रत्येक वस्तू विचार करून निवडली आहे. या लग्झरी रेस्टॉरंटची झलक पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल. गौरी आपल्या या नवीन व्यवसायासाठी खूपच उत्सुक असल्याचंही दिसत आहे.

गौरी एक प्रसिद्ध आणि अनुभवी इंटेरिअर डिझायनरही आहे. मुंबईतील जुहू येथे तिचं गौरी खान डिझाइन्स हे शोरुम आहे. या स्टुडिओची किंमत जवळपास १५० कोटी रुपये इतकी आहे.  आतापर्यंत गौरीने मुकेश आंबानी, नीता आंबानी, रॉबर्टो कॅवल्ली, राल्फ लॉरेन आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची घरं डिझाइन केली आहेत. इंटिरियर डिझायनर असण्यासोबतच गौरी खान प्रोड्युसर देखील आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने पती शाहरुख खानसोबत रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. याद्वारे तिने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 
 

Web Title: see inside video of Gauri Khan's 'Tori' restaurant Torii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.