गुपचूप लग्न करणाऱ्या रिया सेनने म्हटले, ‘प्लॅनिंग करून मुलं जन्माला घालणार नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 09:52 AM2017-10-07T09:52:40+5:302017-10-07T15:23:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी रिया सेन लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. सुरुवातीला लग्न त्याच्यानंतर प्रेग्नेंसी आणि आता मुलांविषयी ...

Secretly married Riya Sen said, 'Planning will not give birth to children'! | गुपचूप लग्न करणाऱ्या रिया सेनने म्हटले, ‘प्लॅनिंग करून मुलं जन्माला घालणार नाही’!

गुपचूप लग्न करणाऱ्या रिया सेनने म्हटले, ‘प्लॅनिंग करून मुलं जन्माला घालणार नाही’!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी रिया सेन लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. सुरुवातीला लग्न त्याच्यानंतर प्रेग्नेंसी आणि आता मुलांविषयी एक बोल्ड वक्तव्य करून ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. रियाने एका मुलाखतीत मान्य केले की, ‘मला लवकर मूल होऊ देण्यात कुठल्याही प्रकारची घाई नाही. खरं तर मी माझ्या आयुष्यात कधीच कुठलीच गोष्ट प्लॅन केली नाही. त्यामुळे माझा बेबी कसा काय प्लॅनिंगने होणार? मी हनीमूनला जात आहे. शिवाय माझ्या या रोमॅण्टिक ट्रिपविषयी मी खूपच एक्साइटेड आहे. आम्ही दोघे एम्सटर्डम येथे जात आहोत. यास जर तुम्ही मिनी-हनीमून म्हटले तर चुकीचे ठरू नये.’ यावेळी रियाने बोलताना हे सुद्धा सांगितले की, एम्सटर्डम येथे पती शिवम याने एक प्रदर्शन भरविले आहे. त्यामुळे याठिकाणी त्याचे बरेचसे मित्र येण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी रिया तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने अचानकच आॅगस्ट महिन्यात उद्योगपती बॉयफ्रेंड शिवम तिवारी याच्यासोबत पुण्यात गुपचूप लग्न उरकले होते. या लग्नाचे जेव्हा काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हा एकच खळबळ उडाली होती. रियाच्या लग्नात दोन्हीकडचे मोजकेच परिवारातील सदस्य उपस्थित होते. जेव्हा रियाच्या लग्नाची बातमी समोर आली होती तेव्हा असा कयास लावला जात होता की, रिया लग्नाअगोदरच गर्भवती आहे. कदाचित याच कारणामुळे या दोघांनी लगबगीने लग्न उरकले असावे. 



जेव्हा रिया गर्भवती असल्याची बातमी वाºयासारखी पसरू लागली तेव्हा तिनेच समोर येत स्पष्ट केले की, मी गर्भवती नसल्याचे स्पष्ट केले. रियाचे पती शिवम तिवारी पेशाने फोटोग्राफर आहे. सोशल मीडियावर त्याचे बरेचसे ट्रॅव्हल ट्रिप आणि डेस्टिनेशंसचे फोटा बघावयास मिळत असतात. असो, रियाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, ती लवकरच एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २.२’मध्ये अतिशय बोल्ड अंदाजात बघावयास मिळणार आहे. या वेबसिरीजमधील तिच्या भूमिकेविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Web Title: Secretly married Riya Sen said, 'Planning will not give birth to children'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.