हे आहे प्रिती झिंटाच्या फिटनेसचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:40 IST2018-07-31T12:35:42+5:302018-07-31T12:40:46+5:30

प्रिती मानते एक्सरसाइज हा फिटनेसचा आवश्यक भाग.

This is the secret of Preity Zinta's fitness | हे आहे प्रिती झिंटाच्या फिटनेसचे रहस्य

हे आहे प्रिती झिंटाच्या फिटनेसचे रहस्य

ठळक मुद्देप्रिती स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये गाळते घाम प्रिती शुगर व तेलकट खाणे टाळते


हल्ली फिटनेस क्रेझ वाढत असून अभिनेत्री प्रिती झिंटा वयाच्या ४३व्या वर्षातही फिट आहे. तिने आपल्या फिटनेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती थ्री इन वन एक्सरसाईज करताना दिसते आहे. या व्हिडिओत ती दोन्ही हातात डंबेल्स पकडून एक्सरसाइज करते आहे. ही एक्सरसाइज ट्राय करा फायदा होईल, असे तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. 


प्रितीने ट्विट केले की, थ्री इन वन एक्सरसाइजने आर्म्स आणि बॅकला फायदा मिळेल. विश्वास ठेवा हे ट्राय करा आणि रिजल्ट पाहा. प्रिती सांगते की, तुम्ही तुमच्या डाएटवर कंट्रोल करु शकत असाल तर कोणताही वर्कआउट करणे चांगले असते. यासोबतच नियमित योग, जिम, स्पोर्ट्स आणि वर्कआउट करा. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह रहाल.



 

प्रिती झोपेला आयुष्यातील महत्त्वाचा भाग मानते. तिच्यानुसार शरीराला रिकव्हर करण्यासाठी झोप सर्वात चांगले औषध आहे. एक्सरसाइज हा फिटनेसचा आवश्यक भाग आहे असे ती मानते. सुरुवातीला बॉलिवूडची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला तिला ट्रेन करायची. परंतू गेल्या काही दिवसांपुर्वी तिने जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये तिचा फिटनेस ट्रेनर गेटेट गहन होता.
प्रिती स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये घाम गाळते. परंतू आपल्या डाएटकडेही पुर्ण लक्ष देते. ती भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि प्रोटीन घेते. ताजी फळे खाऊन ती दिवसाची सुरुवात करते. नियमित खुप पाणी पिते. शुगर आणि तेलकट खाणे टाळते. प्रितीचा फिटनेस मंत्रामधून किती जण प्रेरणा घेतात हे पाहणे कमालीचे ठरेल. 

 

 

 

Web Title: This is the secret of Preity Zinta's fitness