स्क्रिप्टला नाही म्हणता आलं पाहिजे -सोनाक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:15 IST2016-11-30T17:13:17+5:302016-11-30T17:15:39+5:30

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा समजंसपणे पण तेवढ्याच बिनधास्तवृत्तीने तिच्या भूमिकांकडे  पाहत असते. ‘अकिरा’ आणि ‘फोर्स २’ च्या रिलीजनंतर ...

The script should not be called - Sonakshi | स्क्रिप्टला नाही म्हणता आलं पाहिजे -सोनाक्षी

स्क्रिप्टला नाही म्हणता आलं पाहिजे -सोनाक्षी

लिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा समजंसपणे पण तेवढ्याच बिनधास्तवृत्तीने तिच्या भूमिकांकडे  पाहत असते. ‘अकिरा’ आणि ‘फोर्स २’ च्या रिलीजनंतर तिच्या अभिनयाचे चाहत्यांसोबतच समीक्षकांनीही  कौतुक केले. तिला आगामी ‘अ‍ॅक्शन स्टार’ म्हणून ओळखण्यात येत आहे. ‘नूर’ मध्ये तिने पत्रकाराची भूमिका साकारली असून ती म्हणते, चांगले चित्रपट जर आपल्या नावावर यावे असे वाटत असेल तर कधीकधी
स्क्रिप्टला नाही म्हणणंही जमलं पाहिजे. 

प्रियांकाने एकदा ‘त्या’ अभिनेत्यासोबत काम करायचे नाही म्हणून चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर प्रियांकाला सर्वांनी ‘उद्धट’ म्हणून संबोधित केले. पण, सोनाक्षी मात्र, तिला पाठिंबा देत म्हणते,‘ पीसीने जे काही केले ते योग्यच होते. तिला एक कलाकार म्हणून तिच्या चित्रपटाची स्क्रिप्ट नाकारण्याचा अधिकार आहे. एखाद्या चित्रपटासाठी काम करावयाचे नसेल तर स्क्रिप्टला नाही म्हणायला जमलं पाहिजे. ’

सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये ६ वर्षे पूर्ण केली असून आता तिला इंडस्ट्रीत राहण्याचे काही फंडे कळू लागले आहेत. नेहमी स्क्रिप्टला होय म्हणून जमत नाही तर कधीकधी नाही देखील म्हणावं लागतं. ही एक लर्निंग प्रोसेस असते. एखादी वेळ असते की ज्यावेळी आपण नाही म्हणू शकत नाही. पण, चांगल्या कलाकाराचं वैशिष्ट्यच ते आहे की, योग्य स्क्रिप्ट निवडूनच चित्रपटासाठी होय म्हटले पाहिजे.

Web Title: The script should not be called - Sonakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.