Corona Virus : म्हणे, ‘ती आजारी आहे, तिला तरी सोडा’; मिनी माथूरला आला कनिका कपूरचा ‘पुळका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 18:28 IST2020-03-22T18:28:12+5:302020-03-22T18:28:50+5:30

गायिका कनिका कपूर ही कोरोनाग्रस्त होण्याच्या प्रकरणात अनेकांनी आपापली मते सोशल मीडियावर मांडली. आता या केसमध्ये मिनी माथूरनेही उडी घेतली आहे.

 To say, 'She is sick, leave her'; Kanika Kapoor's arrives at Mini Mathur | Corona Virus : म्हणे, ‘ती आजारी आहे, तिला तरी सोडा’; मिनी माथूरला आला कनिका कपूरचा ‘पुळका’

Corona Virus : म्हणे, ‘ती आजारी आहे, तिला तरी सोडा’; मिनी माथूरला आला कनिका कपूरचा ‘पुळका’

बॉलिवूड अभिनेत्री मिनी माथूर ही सोशल मीडियावर ट्रोल होण्याला कधीच घाबरत नाही. तिला जे म्हणायचं आहे ते ती बिनधास्तपणे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत मांडत असते. गायिका कनिका कपूर ही कोरोनाग्रस्त होण्याच्या प्रकरणात अनेकांनी आपापली मते सोशल मीडियावर मांडली. आता या केसमध्ये मिनी माथूरनेही उडी घेतली आहे. ती म्हणते,‘कनिका कपूरला फसवले जात आहे. ती आजारी आहे. तिला ट्रोल करणं आता तरी थांबवा, असे आवाहन ती नेटकऱ्यांना करतेय. कनिका कपूरवर लखनऊ आणि बिहारसमवेत अजून ३ ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आली असून मिनीने यातून तिला फसवले जात असल्याचे सांगितले आहे. 

मिनी माथूर हिने टिवट करून सांगितले की,‘माझी आणि कनिकाची वैयक्तिक अशी काही ओळख नाही. परंतु, कुणी मुद्दामुन आपल्या घरच्यांना अडचणीत का टाकेल? ती गैरजबाबदार आहे का? ती काही गोष्टींकडे दुर्लक्ष करते का? ती आरोपी आहे का? हे चुकीचे आहे. तिच्याविरूद्ध एफआयआर करून तिला फसवले जात आहे. थोडी दया दाखवा; ती आजारी आहे.’

मिनी माथूरच्या टिवटला रिटिवट करत युजर्सने त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या. एकाने लिहिले, हे सेलिब्रिटी गैरजबाबदारच असतात. यांना कुणाचीही भीती वाटत नाही. ५ वर्षाच्या मुलाप्रमाणे यांचा व्यवहार असतो. यावर मिनीने उत्तर दिले की,‘तुम्ही खूपच जबाबदार दिसता आहात.’ असा खोचक टोमणा मारत त्याला शांत बसवले.

Web Title:  To say, 'She is sick, leave her'; Kanika Kapoor's arrives at Mini Mathur