'The 7 Dogs' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान आणि संजय दत्तचा दिसला स्वॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:46 IST2026-02-10T15:46:00+5:302026-02-10T15:46:57+5:30
बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत.

'The 7 Dogs' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान आणि संजय दत्तचा दिसला स्वॅग
7 Dogs Trailer Released : बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. मात्र, यावेळी हा धमाका बॉलिवूडमध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'The 7 Dogs' या सौदी अॅक्शन चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामध्ये सलमान आणि संजयच्या 'कॅमिओ'ने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
'बॅड बॉईज फॉर लाइफ' फेम चित्रपट निर्माते आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान अत्यंत स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. तर संजय दत्त लूकमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
काय आहे 'The Seven Dogs'ची कथा?
हा चित्रपट मध्य पूर्वेत वेगाने पसरणाऱ्या एका धोकादायक अमली पदार्थाला रोखण्याच्या थरारक मोहिमेवर आधारित आहे. सौदी अरेबियाच्या जनरल एंटरटेनमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष तुर्की अल-शेख यांनी ही कथा लिहिली आहे. या चित्रपटात इजिप्शियन स्टार करीम अब्देल-अजीज, अहमद एझ आणि जगप्रसिद्ध इटालियन अभिनेत्री मोनिका बेलुची मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या दोघांनी चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यांच्या भूमिका जरी छोट्या असल्या तरी त्या कथेला मोठी कलाटणी देणाऱ्या आहेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कधी होणार प्रदर्शित?
आंतरराष्ट्रीय दर्जाची अॅक्शन असलेला 'The Seven Dogs' हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस जगभरात प्रदर्शित होणार आहे. याआधी सलमान आणि संजय दत्त यांनी 'साजन', 'दस' आणि 'चल मेरे भाई' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.