मराठी दिग्दर्शकाच्या 'या' बॉलिवूड सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, जमवला १०० कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:47 PM2023-07-11T14:47:33+5:302023-07-11T14:51:11+5:30

कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू, १२ दिवसांत पार केला १०० कोटींचा आकडा

satyaprem ki katha box office collection kartik aaryan kiara advani movie crossed 100cr worldwide | मराठी दिग्दर्शकाच्या 'या' बॉलिवूड सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, जमवला १०० कोटींचा गल्ला

मराठी दिग्दर्शकाच्या 'या' बॉलिवूड सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, जमवला १०० कोटींचा गल्ला

googlenewsNext

बहुचर्चित 'सत्यप्रेम की कथा' या बॉलिवूड चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. मराठी दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. 

२९ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत ९.२५ कोटींची विक्रमी कमाई केली. १२ दिवसांत या चित्रपटाने देशात ६८.०८ कोटींचा गल्ला जमवला आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 

मराठी अभिनेत्याच्या कारमधून महागडी बॅग चोरीला, म्हणाला, "गाडीची काच फोडून..."

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने अवघ्या बारा दिवसांत जगभरात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "चित्रपटावर प्रेम दाखवल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."

'सत्यप्रेम की कथा' हा समीर विध्वंस यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. याआधी त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 'आनंदी गोपाळ', 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'धुरळा' असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. 

Web Title: satyaprem ki katha box office collection kartik aaryan kiara advani movie crossed 100cr worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.