​ सासरी पोहोचली अनुष्का शर्मा...देसी लूकमधील फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 11:17 IST2017-12-20T05:47:16+5:302017-12-20T11:17:16+5:30

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हनीमूनवरून परतले आहेत. गत ११ नोव्हेंबरला अनुष्का व विराट यांनी इटलीत अगदी गूपचूप लग्न ...

Sasari reached the Anushka Sharma ... photo viral in the country look! | ​ सासरी पोहोचली अनुष्का शर्मा...देसी लूकमधील फोटो व्हायरल!

​ सासरी पोहोचली अनुष्का शर्मा...देसी लूकमधील फोटो व्हायरल!

ुष्का शर्मा आणि विराट कोहली हनीमूनवरून परतले आहेत. गत ११ नोव्हेंबरला अनुष्का व विराट यांनी इटलीत अगदी गूपचूप लग्न उरकले. खरे तर यामुळे अनेकजण यामुळे नाराज आहेत. विराट व अनुष्काने लग्नात आपल्याला बोलवले नाही, याचा हा राग आहे. पण आता हा राग दूर करण्यासाठी आणि लग्नाची अधिकृत घोषणा करण्यासाठी विराट व अनुष्काने जंगी रिसेप्शन प्लान केले  आहे. दिल्लीत उद्या २१ डिसेंबरला विराट व अनुष्काचे जंगी रिसेप्शन होणार आहे. यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत आणखी दुसरी रिसेप्शन पार्टी रंगणार आहे. या रिसेप्शनची तयारी सुरु झाली आहे. तूर्तास या नववूध आणि वराबद्दल ताजी बातमी द्यायची झाल्यास, विराट व अनुष्का दोघेही हनीमूनवरून परतले आहे. सध्या अनुष्का सासरी आहे. होय, विराटच्या कुटुंबासोबत दिल्लीत ती वेळ घालवतेय.





सासरी पोहोचलेल्या अनुष्काचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. यात अनुष्का सासरच्या मंडळींसोबत गप्पा-गोष्टी करण्यात बिझी आहे. अनुष्काच्या शेजारीच विराट बसलेला आहे. त्याने कुर्ता पायजामा घातलेला आहे तर अनुष्का फुल्ल टू देसी लूकमध्ये आहे. तिने पिंक कलरचा सलवार सूट कॅरी केला आहे. नव्या नवरीने कसे असावे, हे भान अनुष्काला आहे, हेच यावरून म्हणावे लागले.
विराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु होते. एका कमर्शिअलच्या शूटवेळी दोघांचीही भेट झाली होते. अर्थात २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते. 

Web Title: Sasari reached the Anushka Sharma ... photo viral in the country look!