नणंद-भाभी...! अफेअरच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या बहिणीबरोबर दिसली सारा तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 04:10 PM2024-01-21T16:10:11+5:302024-01-21T16:10:26+5:30

अफेअरच्या चर्चांदरम्यानच सारा तेंडुलकरला शुबमनच्या बहिणीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे. 

Sara Tendulkar spotted with Shubman Gill sister shehneel amid dating rumours | नणंद-भाभी...! अफेअरच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या बहिणीबरोबर दिसली सारा तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल

नणंद-भाभी...! अफेअरच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या बहिणीबरोबर दिसली सारा तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल

सेलिब्रिटींचे अफेअर्स, डेटिंग या चर्चा कलाविश्वात कायमच रंगलेल्या पाहायला मिळतात. गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा युवा क्रिकेटर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक साराच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. शुबमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता अफेअरच्या चर्चांदरम्यानच सारा तेंडुलकरला शुबमनच्या बहिणीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे. 

सारा आणि शुबमनची बहीण शहनिल गिल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सारा आणि शहनिल एकाच कारमध्ये बाजूला बसल्याचं दिसत आहे. एका पार्टीनंतर त्यांना स्पॉट करण्यात आलं. या व्हिडिओत शुबमनच्या बहिणीने चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसत आहे. पण, पापाराझींचा कॅमेरा समोर येताच साराने तोंड लपवल्याचंही दिसत आहे. तसंच सारा लाजतानाही दिसत आहे. वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

सारा आणि शहनिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "रिश्ता पक्का समझे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "अरे वाह नणंद-भाभी एकत्र" असंही एकाने म्हटलं आहे. "वहिनीला भेटायला आली होती ती", अशी कमेंटही केली आहे. 

दरम्यान, 'कॉफी विथ करण'मध्ये सारा खानने "सारा का सारा इंडिया गलत सारा के पिछे पडा है" असं म्हणत तिच्या आणि शुबमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर शुबमन आणि सारा तेंडुलकरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 

 

Web Title: Sara Tendulkar spotted with Shubman Gill sister shehneel amid dating rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.