हृतिक रोशनसोबत काम करण्यासाठी सारा खानने ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 12:19 IST2016-12-13T11:34:04+5:302016-12-13T12:19:02+5:30

हृतिक रोशनचा ‘काबील’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तत्पूर्वीच  करण मल्होत्राचा एक चित्रपट हृतिक झळकणार अशी बातमी आहे. करण ...

Sara Khan kept the condition of working with Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत काम करण्यासाठी सारा खानने ठेवली ही अट

हृतिक रोशनसोबत काम करण्यासाठी सारा खानने ठेवली ही अट

तिक रोशनचा ‘काबील’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तत्पूर्वीच  करण मल्होत्राचा एक चित्रपट हृतिक झळकणार अशी बातमी आहे. करण मल्होत्राने हृतिकला घेऊन ‘अग्निपथ’ साकारला होता. आता हृतिकसोबत एक कॉमिडी-ड्रामा आणण्याची तयारी करणने केली आहे. बातमी केवळ एवढीच नाही, तर यापुढे खरी बातमी आहे. होय, करण मल्होत्राच्या या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खानची २४ वर्षांची मुलगी अली खान ही झळकणार असल्याची खबर आहे.



यापूर्वी सारा करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी आली होती. मात्र साराने तिची आई आणि तिच्या पीआर कंपनीमुळे या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतले. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासंदर्भातील साराच्या करारात एक अट ठेवण्यात आली होती. या अटीनुसार, साराला टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी संलग्न होणे बंधनकारक होते. यानंतर ही एजन्सी साराचे प्रोफेशनल मॅटर्स हँडल करणार होती. मात्र साराची आई अमृता सिंग यांनी ही अट मानण्यास नकार दिला. त्यामुळे करण जोहरचा प्रोजेक्ट साराच्या हातून गेला. पण आता करण मल्होत्राचा प्रोजेक्ट साराच्या हाती लागला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण मल्होत्राच्या कॉमेडी चित्रपटातून सारा बॉलिवूड डेब्यू करणार. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. पण येत्या मार्चपासून याचे शूटींग सुरु होणार आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात सारा हृतिकसोबत दिसणार आहे. आता या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते, ते बघूयात!

२०१५ मध्ये मल्होत्राचा ‘ब्रदर्स’ हा सिनेमा आला होता. यात अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sara Khan kept the condition of working with Hrithik Roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.