​ ‘सारा जमाना उर्वशी का दिवाना...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 11:21 IST2016-12-15T11:21:47+5:302016-12-15T11:21:47+5:30

Kaabil song Haseeno Ka Deewana with Urvashi Rautela :Urvashi Rautela : Kaabil song Haseeno Ka Deewana : हृतिक रोशन याच्या ‘काबील’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘सारा जमाना...’ हे दुसरे गाणे आज रिलीज झाले. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेलाच्या हॉट अदा या गाण्यात पाहायला मिळत आहे.

'Sara Jamanana Urvashi Ki Diwana ...' | ​ ‘सारा जमाना उर्वशी का दिवाना...’

​ ‘सारा जमाना उर्वशी का दिवाना...’

तिक रोशन याच्या ‘काबील’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘सारा जमाना...’ हे दुसरे गाणे आज रिलीज झाले. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेलाच्या हॉट अदा या गाण्यात पाहायला मिळत आहे.  जुन्या हिंदी गाण्यांना रिमिक्सचा तडका देऊन वापरण्याचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये आला आहे. ‘काबील’ने सुद्धा नेमका हा ट्रेंड पुढे नेत अमिताभ बच्चन यांचे एकेकाळी प्रचंड गाजलेले ‘सारा जमाना...’ हे गाणे सादर केले आहे.

उर्वशीच्या हॉट अदांसह हे गाणे नव्या रूपात प्रेक्षकांना ‘काबील’मध्ये दिसणार आहे. या गाण्यात उर्वशी अगदी मनसोक्त थिरकतांना दिसतेयं.
अमिताभचे हे गाणे लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतले होते. हेच गाणे दुसºयांदा अगदी नव्या रूपात पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी चांगला अनुभव असणार आहे. या गाण्याच्या नव्या व्हर्जनला फीमेल व्हॉईससह एक नवा साज चढवण्यात आला आहे.
‘याराना’ चित्रपटातील हे गाणे अमिताभ यांच्यावर चित्रीत केले गेले होते. संगीतकार राजेश रोशन यांच्या या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरबद्ध केले होते.



संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक आणि यामी गौतम अंध प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत असून रोनित रॉय खलनायक साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘काबील’ चे  ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. यानंतर गेल्या आठवड्यात ‘काबील हूं’ हे  टायटल साँग लाँच करण्यात आले होते. या टायटल साँगला लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला असतानाच आज ‘सारा जमाना...’ हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यातील बोल्ड उर्वशीचा बोल्ड अवतार तुम्ही बघा तर...

Web Title: 'Sara Jamanana Urvashi Ki Diwana ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.