'धुरंधर' पाहिल्यानंतर रडू लागले सारा अर्जुनचे आई वडील, अभिनेत्री म्हणाली- "त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:03 IST2026-01-30T14:02:57+5:302026-01-30T14:03:52+5:30

'धुरंधर'ने साराला प्रसिद्धीझोतात आणलं आहे. सिनेमात तिने साकारलेल्या यालिना जमाली या भूमिकेचंही प्रचंड कौतुक होत आहे. 

sara arjun revealed her parents get in tears after watching dhurandhar was best memory | 'धुरंधर' पाहिल्यानंतर रडू लागले सारा अर्जुनचे आई वडील, अभिनेत्री म्हणाली- "त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिल्यानंतर..."

'धुरंधर' पाहिल्यानंतर रडू लागले सारा अर्जुनचे आई वडील, अभिनेत्री म्हणाली- "त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिल्यानंतर..."

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा अजूनही थिएटर गाजवतोय. या सिनेमात रणवीरची हिरोईन बनून अभिनेत्री सारा अर्जुनने लाइमलाइट लुटली. 'धुरंधर'ने साराला प्रसिद्धीझोतात आणलं आहे. सिनेमात तिने साकारलेल्या यालिना जमाली या भूमिकेचंही प्रचंड कौतुक होत आहे. 

साराने नुकतंच तिच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुमा कनकालाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सगळ्यात चांगला दिवस कोणता होता? याबद्दल विचारलं. तेव्हा साराने 'धुरंधर' सिनेमाबाबत आईवडिलांचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, "माझ्यासाठी तो दिवस सगळ्यात खास होता जेव्हा माझ्या कामामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. ते पाहून मला जो आनंद झाला तो मी शब्दांत मांडू शकत नाही". "तुझ्या शैक्षणिक यशामुळे त्यांना आनंद झाला होता का?" असं विचारल्यावर सारा म्हणाली की "नाही, हे धुरंधरमुळे झालं होतं". 


'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना अशी स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आत्तापर्यंत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ८३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Web Title : 'धुरंधर' देखने के बाद सारा अर्जुन के माता-पिता रो पड़े, अभिनेत्री ने किया खुलासा

Web Summary : 'धुरंधर' में सारा अर्जुन के अभिनय को देखकर उनके माता-पिता भावुक हो गए। अभिनेत्री ने रणवीर सिंह अभिनीत हिट फिल्म में अपने काम पर उनकी प्रतिक्रिया देखकर खुशी व्यक्त की। सारा ने फिल्म में यालिन की भूमिका निभाई है। सारा के अभिनय की खूब सराहना हो रही है।

Web Title : Sara Arjun's parents cried after watching 'Dhurandhar,' actress reveals

Web Summary : Sara Arjun's parents were moved to tears by her performance in 'Dhurandhar.' The actress shared the emotional moment, expressing immense joy at witnessing their reaction to her work in the hit film starring Ranveer Singh. 'Dhurandhar' sees Sara playing the role of Yalin.