कार्तिक आर्यन नव्हे तर या व्यक्तीवर होते सारा अली खानचे क्रश, तिनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:00 IST2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:02+5:30

सारानेच ही गोष्ट एका कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली आहे.

Sara Ali Khan’s first crush was the guy her best friend was dating | कार्तिक आर्यन नव्हे तर या व्यक्तीवर होते सारा अली खानचे क्रश, तिनेच दिली कबुली

कार्तिक आर्यन नव्हे तर या व्यक्तीवर होते सारा अली खानचे क्रश, तिनेच दिली कबुली

ठळक मुद्देआपल्या शालेय जीवनातील रोमान्सबद्दल साराने देखील या कार्यक्रमात एक सिक्रेट सांगितले. ती म्हणाली, माझी जिवलग मैत्रीण ज्या मुलाला डेट करत होती, त्याच्यावरच माझे क्रश होते. पण मैत्रिणीचा तो बॉयफ्रेंड असल्याने पुढे काही झाले नाही.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला लव्ह आज कल 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते दोघे सध्या व्यग्र आहेत. पण त्याचसोबत सध्या त्यांच्या अफेअरच्या चर्चांना देखील ऊत आले आहे. त्या दोघांनी यावर मौन पाळणं पसंत केले असले तरी त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते.

लव्ह आज कल 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक सध्या विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. झी टीव्ही वरील प्रो-म्युझिक काऊंटडाऊन या कार्यक्रमात ते दोघे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात सारा आणि कार्तिक त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही सिक्रेट शेअर करताना दिसणार आहेत. 

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सिद्धार्थ कन्ननने कार्तिकला विचारले की, कोणत्या मुलीने तुला कधी प्रपोज केले आहे का? त्यावर तो म्हणाला, त्या गोष्टीला आता बरीच वर्षं झाली आहेत. मी त्यावेळी शाळेत होतो, तेव्हा एका मुलीने मला प्रपोज केले होते. वर्गात मी तिच्याचसोबत बसत असे आणि तेव्हा मी अगदी अभ्यासू विद्यार्थी होतो. मी तर अनेकवेळा तिचाही गृहपाठ करून देत असे; पण मी इतके करूनही ती नापास झाली होती.”

आपल्या शालेय जीवनातील रोमान्सबद्दल साराने देखील या कार्यक्रमात एक सिक्रेट सांगितले. ती म्हणाली, माझी जिवलग मैत्रीण ज्या मुलाला डेट करत होती, त्याच्यावरच माझे क्रश होते. पण मैत्रिणीचा तो बॉयफ्रेंड असल्याने पुढे काही झाले नाही.

साराने एका टॉक शोमध्ये कार्तिक आर्यनबद्दल तिला वाटत असलेल्या भावना व्यक्त केल्यावर तिचे चाहते तिला त्याच्याबरोबर एका चित्रपटात रोमँटिक भूमिका साकारण्याची वाट पाहात होते. त्यामुळे इम्तियाझ अलीच्या ‘लव्ह आज कल 2’  या चित्रपटात हे दोन कलाकार एकत्र भूमिका साकारणार आहेत, हे जाहीर झाल्यावर त्यांच्या चाहत्यांचे स्वप्न साकार झाले. सारा आणि कार्तिक यांची जोडी खूपच छान असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Web Title: Sara Ali Khan’s first crush was the guy her best friend was dating