मीडियाचे कॅमेरे दिसताच पळाली सारा खान, एरव्ही द्यायची पोज वर पोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:53 IST2021-02-10T13:53:26+5:302021-02-10T13:53:54+5:30

शॉल अंगावर घेत तिने तिचा चेहरा दिसणार नाही असा झाकला होता.  साराची एक तरी छवी कॅमे-यात कैद व्हावी यासाठी सारेच फोटोग्राफर तिला आवाज देत होते.

sara ali khan was running away from the paparazzi video viral | मीडियाचे कॅमेरे दिसताच पळाली सारा खान, एरव्ही द्यायची पोज वर पोज

मीडियाचे कॅमेरे दिसताच पळाली सारा खान, एरव्ही द्यायची पोज वर पोज

सारा अली खानला दिसताच सगळ्या मीडियाचे कॅमेरे तिच्याकडे नाही वळाले तर नवलच. सारा देखील नेहमीच मीडियाला पोज पोजवर देताना दिसते. विशेष म्हणजे अतिशय नम्रपण ती फोटोग्राफर्ससोबत बोलताना दिसते आणि प्रत्येकाला हसत हसत फोटो देताना दिसते. मात्र नेमके असे काय घडले असावे जेव्हा गाडीतून बाहेर येताच तिने मीडियाला पाहून पळ काढला. शॉल अंगावर घेत तिने तिचा चेहरा दिसणार नाही असा झाकला होता.  साराची एक तरी छवी कॅमे-यात कैद व्हावी यासाठी सारेच फोटोग्राफर तिला आवाज देत होते.

 

साराला  पळताना पाहून  फोटोग्राफर्सही संभ्रमात पडले आणि काही कळेल तोपर्यंत सारा तिथून निघून गेली. साराची आई अमृता सिंहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आई अमृतासह सारा दिसली. एरव्ही अमृता मीडियाला फोटो देण्यासाठी फारसे ईच्छुक नसतात. तेव्हा साराच पुढे येत मीडियाला फोटो देते. मात्र यावेळी आई साराने मीडियाला पोजवर पोज दिल्या आणि मुलगी साराने मात्र पळ काढला असे पहिल्यांदाच घडले असावे. सोशल मीडियावर साराचा हा व्हिडीओ व्हायरल समोर येताच चाहतेही विविध कमेंट करत व्हिडीओची मजा घेत आहेत. लाईक्स आणि कमेंटस देत पसंतीही देत आहे. 


साजिद नाडियाडवालाने पूर्ण केले साराला दिलेलं वचन, 'या' बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

साजिदने सारा अली खानला आपल्या सिनेमात घेण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. तिला आणखी एक मोठा सिनेमा ऑफर केला. टायगर श्रॉफसह सारा अली खानला 'बागी 4' मध्ये कास्ट केल्याची बातमी आहे. साजिदने सिनेमातील फिमेल लीडसाठी साराचे नाव फायनल केले आहे. खरं तर साराला 'हिरोपंती 2' मध्ये घ्यायचा होता पण तारा सुतारियाला तिच्या जागी घेण्यात आले.


मीडियाचे कॅमेरे दिसताच भडकली सारा अली खान, Video Viral

सारा अली खान विमानतळावर येताच मीडियाच्या कॅमे-यांनी तिला घेरले होते.साराने पांढरा सलवार सूट परिधान केला होता. यावेळी चेह-यावर मास्कही लावला होता. साराचे निट फोटो काढता यावेत म्हणून फोटोग्राफर तिला मास्क काढण्यासाठी सांगत होते. मात्र साराने असे केले नाही. सुरक्षेसाठी प्रत्येकाने मास्क लावणे गरजेच आहे. प्रत्येकाला सारा हसतमुखाने मास्क काढणार नसल्याचे सांगत होती. तरीही कोणीही तिचे ऐकत नव्हते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळतंय.इशारे करत सारा नकार देत होती. काही वेळानंतर ती इरिटेटही झाली.

Web Title: sara ali khan was running away from the paparazzi video viral