ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:12 IST2023-12-11T10:11:51+5:302023-12-11T10:12:10+5:30

Bhool Bhulaiya 3 : 'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे.

Sara Ali Khan to appear in 'Bhool Bhulaiya 3' with ex-boyfriend Kartik Aryan after breakup? Shooting will start soon | ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत त्याचे दोन्ही भाग सुपरहिट झाले आहेत. अक्षय कुमारने 'भूल भुलैया'मध्ये चौकार आणि षटकार मारले होते, तर कार्तिक आर्यन(Kartik Aryan)ने त्याच्या सीक्वलमध्ये आपले नशीब कमावले होते. आता 'भूल भुलैया ३' च्या कलाकारांसंदर्भात मोठे अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. 'भूल भुलैया ३' मध्येही कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार असल्याचे नुकतेच समोर आले होते, त्यानंतर आता त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे.

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३' मध्ये पाहायला मिळणार आहे. याआधी दोघे इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल'मध्ये दिसले होते. या दोघांनी २०२० नंतर एकत्र कोणताही चित्रपट केलेला नाही. 'भूल भुलैया ३'चे शूटिंग फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणार असल्याची चर्चा आहे. कियारा आडवाणी 'भूल भुलैया २'मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसली होती. आता समजते आहे की सारासोबत कार्तिकची जोडी होऊ शकते. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

'भूल भुलैया ३' मधून तब्बू आउट
'भूल भुलैया ३' मधील सर्वात मोठे अपडेट म्हणजे तब्बूने चित्रपट नाकारला आहे. मोठ्या रकमेची ऑफर आल्यानंतरही अभिनेत्रीने चित्रपट करण्यास नकार दिला आहे. पडद्यावर तीच भूमिका पुन्हा पुन्हा करायची नाही, असे ती सांगते.

सारा अली खान आणि कार्तिकचे रिलेशनशीप
'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये, सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. तिने त्याच्यासोबतचे ब्रेकअप तिच्यासाठी कसे सोपे नव्हते याबद्दल सांगितले. अनन्या पांडेसोबत ती या चॅट शोमध्ये दिसली होती.

Web Title: Sara Ali Khan to appear in 'Bhool Bhulaiya 3' with ex-boyfriend Kartik Aryan after breakup? Shooting will start soon