सारा अली खानने भाऊ इब्राहिमसाठी वाढदिवसाला शेअर केला हा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:40 IST2019-03-05T12:37:07+5:302019-03-05T12:40:03+5:30

सारा अली खानचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतीच एक पोस्ट टाकली असून ही पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Sara Ali Khan shares goofy photos with brother Ibrahim Ali Khan and it's the cutest birthday wish ever | सारा अली खानने भाऊ इब्राहिमसाठी वाढदिवसाला शेअर केला हा खास फोटो

सारा अली खानने भाऊ इब्राहिमसाठी वाढदिवसाला शेअर केला हा खास फोटो

ठळक मुद्देसारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान याचा आज वाढदिवस असून तिने या खास पोस्टद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक क्यूट फोटो शेअर केला असून या फोटोत इब्राहिमने साराला उचलून घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे.तिने या पोस्टसोबत लिहिले आहे की, जगातील सगळ्यात चांगल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या पाठिशी नेहमीच उभे राहाण्यासाठी आणि माझा वेडेपणा सहन करण्यासाठी धन्यवाद.

सैफ अली खानची गणना आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी सारा अली खानने देखील बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. सिम्बा हा तिचा चित्रपट तर चांगलाच गाजला. सारा अली खानचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतीच एक पोस्ट टाकली असून ही पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान याचा आज वाढदिवस असून तिने या खास पोस्टद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक क्यूट फोटो शेअर केला असून या फोटोत इब्राहिमने साराला उचलून घेतले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिने या पोस्टसोबत लिहिले आहे की, जगातील सगळ्यात चांगल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या पाठिशी नेहमीच उभे राहाण्यासाठी आणि माझा वेडेपणा सहन करण्यासाठी धन्यवाद.

साराने हा फोटो शेअर केल्यापासून तिचे फॅन्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहे. सारा आणि इब्राहिम यांच्यात खूप चांगले बॉण्डिंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर इब्राहिम हा सैफ अली खानसारखाच दिसत असल्याचे अनेकांनी कमेंटद्वारे सांगितले आहे.

साराने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत देखील इब्राहिमविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. साराने सीएनएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असताना इब्राहिम मला म्हणाला होता की, त्याला माझ्याबद्दल अभिमान वाटतो. इब्राहिमकडून हे ऐकणे माझ्यासाठी खूप खास होते. 

सारा सिम्बा या चित्रपटाच्या यशानंतर नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. सैफ अली खानचा लव्ह आज कल हा चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग लव्ह आज कल २ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात सारा आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Web Title: Sara Ali Khan shares goofy photos with brother Ibrahim Ali Khan and it's the cutest birthday wish ever