सारा खानला केदारनाथमध्ये No Entry! मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय, म्हणाले- "ती स्वत:ला सनातनी मानत असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:45 IST2026-03-18T09:43:24+5:302026-03-18T09:45:59+5:30

अनेकदा साराने केदारनाथची यात्रा केली आहे. मात्र आता साराला सहजासहजी केदारनाथ धामचं दर्शन घेता येणार नाही. साराच्या केदारनाथ मंदिरातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. 

sara ali khan has to provide affidavit of being sanatani to enter in kedarnath temple says BKTc | सारा खानला केदारनाथमध्ये No Entry! मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय, म्हणाले- "ती स्वत:ला सनातनी मानत असेल तर..."

सारा खानला केदारनाथमध्ये No Entry! मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय, म्हणाले- "ती स्वत:ला सनातनी मानत असेल तर..."

बॉलिवूड अभिनेत्रा सारा खान कायमच चर्चेत असते. सारा प्रचंड धार्मिक आहे. केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सारा अनेकदा भगवान शंकरासमोर नतमस्तक होताना दिसते. भारतातील विविध मंदिरांनाही ती भेटी देते. याशिवाय अनेकदा साराने केदारनाथची यात्रा केली आहे. मात्र आता साराला सहजासहजी केदारनाथ धामचं दर्शन घेता येणार नाही. साराच्या केदारनाथ मंदिरातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. 

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात उत्तराखंडमधील चारधामचं दरवाजे उघडले जातात. लाखो भाविक दरवर्षी केदारनाथ-बद्रिनाथची यात्रा करतात. अनेक सेलिब्रिटीही केदारनाथ मंदिरात नतमस्तक होताना दिसतात. पण, आता केदारनाथ-बद्रिनाथ मंदिरात सनातनधर्मीय नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाहीये. बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) अलिकडेच पत्रकार परिषद घेत एक आदेश जारी केला आहे. यानुसार, सनातन धर्म नसलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेशासाठी सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. 


बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी १७ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की "हिंदू नसलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांची सनातनी धर्मावर श्रद्धा आहे, तेच सनातनी आहेत. सारा अली खानलाही मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर तिला सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. तरच तिला मंदिरात प्रवेश दिला जाईल. सारा अली खानने सांगितलं की ती सनातनी धर्म मानते, तिची श्रद्धा आणि आणि तिने प्रतिज्ञापत्र सादर केलं तर तिला मंदिरात दर्शन दिलं जाईल". 

साराने २०१६ साली केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. पहिल्याच सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. तेव्हापासूनच साराची केदारनाथवर श्रद्धा आहे. ती अनेकदा केदारनाथ यात्रा करताना दिसते. 

Web Title : सारा अली खान को केदारनाथ मंदिर में प्रवेश निषेध का सामना!

Web Summary : सारा अली खान को केदारनाथ में प्रवेश प्रतिबंध का सामना करना पड़ सकता है। मंदिर प्राधिकरणों को गैर-हिंदुओं को सनातन धर्म में अपनी आस्था घोषित करने की आवश्यकता है। यदि सारा अपनी आस्था की पुष्टि करती है और हलफनामा जमा करती है, तो उसे प्रवेश की अनुमति दी जाएगी।

Web Title : Sara Ali Khan faces entry ban at Kedarnath Temple.

Web Summary : Sara Ali Khan may face restrictions at Kedarnath. Temple authorities require non-Hindus to declare their faith in Sanatan Dharma. If Sara affirms her belief and submits an affidavit, she will be allowed entry.