रिया चक्रवर्तीने सारा अली खानबद्दल केला धक्कादायक खुलासा, सारा घेते गांजा आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:25 IST2021-06-07T18:22:58+5:302021-06-07T18:25:13+5:30
या चौकशीदरम्यान रियाने सारा अली खानचे नाव घेतले असून साराने तिला गांजा ऑफर केला होता असे तिने सांगितले आहे.

रिया चक्रवर्तीने सारा अली खानबद्दल केला धक्कादायक खुलासा, सारा घेते गांजा आणि...
सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे होत आहेत. एनसीबीने सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला काहीच दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कूक आणि हाऊस हेल्परला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
या प्रकरणात NCB द्वारे रियाची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान तिने सारा अली खानचे नाव घेतले असून साराने तिला गांजा ऑफर केला होता असे तिने सांगितले आहे. इतकंच नव्हे तर गांजाच्या हँगओव्हरमधून बाहेर कसं पडायचं? याबाबतही तिनं रियाला माहिती दिली होती.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने चौकशीत सांगितले आहे की, सारा रोल करून गांजाची सिगारेट तयार करत असे. तिने मला देखील ही सिगारेट ऑफर केली होती. 6 जून 2017 मध्ये सारानं तिच्या घरी मला वोडका आणि गांजा ऑफर केला होता. शिवाय या अंमली पदार्थांची नशा चढल्यावर त्यातून बाहेर कसं पडायचं याचा उपाय देखील सांगितला होता. तिने या संदर्भातील काही व्हॉटसअप चॅट देखील दाखवले आहेत.
रियाने दिलेल्या या स्टेटमेंटनंतर आता सारा अली खानची चौकशी केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.