बॉलिवूडमध्ये डेब्यू पूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 20:20 IST2020-04-29T19:59:18+5:302020-04-29T20:20:52+5:30

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खान तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती.

Sara ali khan on ex boyfriend veer pahariya gda | बॉलिवूडमध्ये डेब्यू पूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान

बॉलिवूडमध्ये डेब्यू पूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी- टाऊनमध्ये चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खान तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती.

२०१९मध्ये फिल्मफेअला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लव्ह लाईफबाबतचा खुलासा केला. साराला विचारण्यात आले की तू सिंगल आहे कि नाही ?, यावर ती म्हणाली ''होय, मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. मी फक्त वीर पहारियाला डेट केले आहे.''  वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

Web Title: Sara ali khan on ex boyfriend veer pahariya gda