सारा अली खानने बीचवरचे फोटो शेअर करत दिला व्हॅकेशनचा मंत्र, म्हणाली - हकूना मटाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:39 IST2021-03-24T13:32:56+5:302021-03-24T13:39:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

Sara ali khan chilling on the beach wrote hakuna matata | सारा अली खानने बीचवरचे फोटो शेअर करत दिला व्हॅकेशनचा मंत्र, म्हणाली - हकूना मटाटा

सारा अली खानने बीचवरचे फोटो शेअर करत दिला व्हॅकेशनचा मंत्र, म्हणाली - हकूना मटाटा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. साराला व्हॅकेशनवर जायला खूप आवडते. ती नेहमी तिच्या भाऊ आणि आई व्यतिरिक्त मित्रांसोबत चिल करताना दिसते.अलीकडेच साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने आपले खास फोटो शेअर केले आहेत आणि व्हॅकेशनचा मंत्र सांगितला आहे. 

सारा अली खानने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, "हकुना मटाटा, म्हणजे काळजी करू नका ..."  एक फोटोत ती बीचकडे बघतेय तर दुसऱ्या फोटोत ती बीचवर चील करताना दिसतेय. 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिचा कुली नंबर १ चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. याशिवाय ती 'अतरंगी रे'मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारत आहे. विजय देवरकोंडा 'लिगर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Web Title: Sara ali khan chilling on the beach wrote hakuna matata