सारा अली खानने भल्या पहाटे घेतला सायकलस्वारीचा आनंद...पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 11:48 IST2019-02-24T11:47:20+5:302019-02-24T11:48:51+5:30

साराला सायकलस्वारीची मजा घेताना पाहून पापाराझींमध्ये तिला कॅमे-यात कैद करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. पण इतक्या पहाटे पापाराझींना पाहून साराला मात्र आश्चर्याचा धक्का बसला.

sara ali khan caught while riding a bicycle | सारा अली खानने भल्या पहाटे घेतला सायकलस्वारीचा आनंद...पाहा फोटो!!

सारा अली खानने भल्या पहाटे घेतला सायकलस्वारीचा आनंद...पाहा फोटो!!

ठळक मुद्देसैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान आता स्टार झालीय. ‘केदारनाथ’ या पहिल्याच चित्रपटातून साराने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान आता स्टार झालीय. ‘केदारनाथ’ या पहिल्याच चित्रपटातून साराने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या चित्रपटातील साराच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. यापाठोपाठ आलेल्या तिच्या ‘सिम्बा’ या चित्रपटानेही धूम केली आणि साराने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. सारा पापाराझींचीही आवडती आहे.‘केदारनाथ’ हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी साराने सर्व पापाराझींना स्वहस्तलिखित पत्र पाठवून  कॉफीचे निमंत्रण दिले होते. पापाराझींना व्यक्तिश: भेटून तिने त्यांचे आभार मानले होते. साराचा विनम्र स्वभाव आणि ओठांवरचे प्रेमळ हसू पाहून सगळेच पापाराझी तिच्या प्रेमात पडले होते. साहजिकच आता स्टार बनल्यावर सारा जिथे जाते तिथे फोटोग्राफर्सची एक फौज तिच्या मागे असते. आज पहाटे सारा तिचा भाऊ इब्राहिमसोबत सायकलस्वारी करताना दिसली. साराला सायकलस्वारीची मजा घेताना पाहून पापाराझींमध्ये तिला कॅमे-यात कैद करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. पण इतक्या पहाटे पापाराझींना पाहून साराला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. ‘आप यहां भी...’, असे ती पापाराझींकडून पाहून हसत हसत म्हणाली.

साराने आईचे घर सोडले आणि ती नव्या घरात शिफ्ट झाली, अशी चर्चा गेल्या काही दिवसांत रंगली होती. सामान शिफ्ट करतानाचे तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण असे काहीही नसल्याचे खुद्द साराने स्पष्ट केले होते. मी आईचे घर सोडलेले नाही, ना सोडणार. मी एका जाहिरातीचे शूट करत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले माझे फोटो अ‍ॅड कॅम्पेनचा भाग होता, असे साराने सांगितले होते. 

Web Title: sara ali khan caught while riding a bicycle