सारा अली खान आईसह पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 10:37 IST2019-01-21T10:36:32+5:302019-01-21T10:37:23+5:30

अमृता सिंहचे मामा मधुसूदन बिम्बेट यांच्या प्रॉपर्टीवरून हा वाद समोर आला आहे.

Sara Ali Khan and mother Amrita Singh claim right over a property worth crores in Dehradun | सारा अली खान आईसह पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात, हे आहे कारण

सारा अली खान आईसह पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात, हे आहे कारण

अभिनेत्री सारा अली खानची आई अमृता सिंह एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. देहरादुनमध्ये असलेल्या प्रॉपर्टीच्या कारणामुळे आता एक नवीन वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमृता सिंहचे मामा मधुसूदन बिम्बेट यांच्या प्रॉपर्टीवरून हा वाद समोर आला आहे. मधूसुदन बिम्बेट यांचे कँसर आजारामुळे निधन झाले. म्हणून  सारासह अमृता देहरादुन येथे पोहचले. अंतिम संस्कार होताच दोघेही माय लेकीने सरळ देहरादुन येथील पोलिस स्टेशन गाठले. मीडिया रिपोर्ट नुसार, ज्या ठिकाणी अमृताचे मामा राहत होते त्या घराचा मालकी हक्काची केस ही कोर्टात पेंडीग आहे. म्हणून मधुसुदन यांच्या निधनानंतर लगेचच अमृता आणि सारा त्यांच्या राहत्या घरी पोहचले असल्याचे कारण समोर येत आहे. या प्रॉपर्टीवर माझाही हक्क असल्याचा दावा अमृता सिंहने केला आहे. तर दुसरीकडे  भू-माफियांची  या प्रॉपर्टीवर नजर  असल्याचे अमृताचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांनी या बंगल्यात कोणीही जाऊ  नये म्हणून बंगला सील केला होता. तब्बल 16000 स्के.फिटचा हा बंगला असून मधुसूदन यांच्यानंतर अमृताची मावशीच वारस असणार आहे. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपैकी येथे कोणीही येत नाही तोपर्यंत पोलिसांनीच या करोंडोच्या प्रॉपर्टीची काळी घ्यावी असे अमृताने म्हटले आहे. 

Web Title: Sara Ali Khan and mother Amrita Singh claim right over a property worth crores in Dehradun