सारा आणि कार्तिक आर्यनचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:06 IST2019-03-25T15:45:21+5:302019-03-25T16:06:14+5:30

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लवकरच इम्तियाज अलीचा आगामी सिनेमा 'लव आजकल 2'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

Sara ali khan and kartik aryan love aajkal 2 video viral on social media instagram | सारा आणि कार्तिक आर्यनचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सारा आणि कार्तिक आर्यनचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

ठळक मुद्देसध्या या सिनेमाचं शूटिंग दिल्लीमध्ये सुरु आहेया व्हिडीओत दोघे खूप मस्ती करताना दिसतायेत

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लवकरच इम्तियाज अलीचा आगामी सिनेमा 'लव आजकल 2'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं दिल्लीमध्ये सुरु असलेले शूटिंग नुकतेच संपले  आहे. या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


या व्हिडीओत दोघे खूप मस्ती करताना दिसतायेत. सारा जोरा-जोरात कार्तिकचे नाव घेऊन ओरडताना दिसतेय. हा व्हिडीओ कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा असाच बाईक राईडचा आनंद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  कार्तिक बाईक चालवतोय आणि सारा त्याच्या मागच्या सीटवर बसलेली दिसत होती.

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून सारा अन कार्तिक कायम चर्चेत आहेत.  चाहत्यांनी तर सारा आणि कार्तिकच्या जोडीचे ‘सार्तिक’ असे नामकरणही करून टाकले आहे.  सारा व कार्तिकचा हा चित्रपट ‘लव आज कल’चा सीक्वल असल्याचे म्हटले जातेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. २००९ मध्ये आलेला सैफ अली खान व दीपिका पादुकोणचा ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता.  सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा  यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.  

Web Title: Sara ali khan and kartik aryan love aajkal 2 video viral on social media instagram