कार्तिक आर्यनने सारा अली खानला मारली मिठी, क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:57 IST2019-08-06T13:55:48+5:302019-08-06T13:57:00+5:30

बी-टाऊनमध्ये सध्या कोणती स्टारकीड सर्वाधिक चर्चेत असेल तर ती म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटानंतर साराचा फॅनफॉलोईंग दिवसागणिक वाढत चालला आहे. अशात तिची लव्हस्टोरीही चर्चेत आहेत.

sara ali khan and kartik aaryans latest video from the lucknow airport is going-viral | कार्तिक आर्यनने सारा अली खानला मारली मिठी, क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

कार्तिक आर्यनने सारा अली खानला मारली मिठी, क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून सारा व कार्तिकच्या अफेअरच्या बातम्या रंगत आहेत.

बी-टाऊनमध्ये सध्या कोणती स्टारकीड सर्वाधिक चर्चेत असेल तर ती म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटानंतर साराचा फॅनफॉलोईंग दिवसागणिक वाढत चालला आहे. अशात तिची लव्हस्टोरीही चर्चेत आहेत. होय, अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचे तिचे प्रेम दिवसागणिक बहरत आहे.
सारा आणि कार्तिकने नुकतेच इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल’ या सिनेमाचे शूटींग संपवले. चित्रपटाच्या सेटवरचे दोघांचे रोमॅन्टिक फोटोंची जाम चर्चा झाली. आता या दोघांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


सोमवारी कार्तिक व सारा हे दोघे लखनौ एअरपोर्टवर दिसले. कार्तिक खास साराला ड्रॉप करण्यासाठी आला होता. पण साराची निरोप घेण्याची वेळ आली आणि कार्तिक हळवा झाला. दोघांनीही एकदा नाही तर दोनदा एकमेकांना मिठी मारली. आजुबाजूला अनेक लोक पाहत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दोघांनी एकमेकांना निरोप दिला. सारा मुंबईला परतली आणि कार्तिक लखनौमध्ये थांबला.

कार्तिक सध्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनौमध्ये सुरू आहे. त्यामुळेच सारा त्याला भेटायला भेटायला लखनौला गेली होती. 


गेल्या अनेक दिवसांपासून सारा व कार्तिकच्या अफेअरच्या बातम्या रंगत आहेत. अद्याप दोघांनीही आपले रिलेशनशिप कन्फर्म केलेले नाही. पण आता हे नाते बरेच पुढे गेले आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिक यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.या फोटोत दोघे हातात हात घालून उभे असल्याचे आपल्याला दिसून आले होते.  

Web Title: sara ali khan and kartik aaryans latest video from the lucknow airport is going-viral