'या' सिनेमासाठी साकिब सलीम घेतोय विशेष मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 21:00 IST2019-02-12T21:00:00+5:302019-02-12T21:00:00+5:30
अभिनेता साकिब सलीम तमाम प्रेक्षकांना विशेषतः त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टमधून एक सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

'या' सिनेमासाठी साकिब सलीम घेतोय विशेष मेहनत
ठळक मुद्दे'रेस ३ नंतर साकिब आगामी सिनेमानिमित्त पुन्हा एका रंजक भूमिकेत दिसेल
अभिनेता साकिब सलीम तमाम प्रेक्षकांना विशेषतः त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टमधून एक सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. 'रेस ३' निमित्त या जेननेक्स्ट अभिनेत्याने मसल्स कमी केले तर दुसऱ्या एका भूमिकेसाठी वजन वाढवले होते आणि आता आगामी सिनेमासाठी साकिब परत एकदा जबरदस्त तयारीला लागला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'रेस ३ नंतर साकिब आगामी सिनेमानिमित्त पुन्हा एका रंजक भूमिकेत दिसेल. रेस ३सारखेच तो प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहे. यानिमित्त ऑनस्क्रीन कधीही परिधान न केलेल्या लूकमध्ये तो दिसणार आहे.'
विशेष म्हणजे आगामी प्रोजेक्टसाठी पिळदार शरीरयष्टी हवी असल्याने या गुणी कलाकाराने त्यानुसार प्रशिक्षणाला सुरूवात केली आहे. आता ठरवलेलं लक्ष्य गाठण्यासाठी तो दिवसातील पाच तास कसरत करत असल्याचे समजते. रेस ३च्या तुलनेत साकिबला या आगामी भूमिकेत आणखीन धष्टपुष्ट दिसायचे आहे. त्यासाठी त्याच्या प्रशिक्षकाने या तरुण कलाकाराला खास डाएट आणि जबरदस्त जिम शेड्युल आखून दिल्याचे सूत्रांकडून कळते. याविषयी साकिब सांगतो, 'सध्या मी माझ्या भूमिकेबद्दल जास्त काही बोलू शकत नाही, मात्र याआधी मी असे काही केले नाहीय एवढे मात्र नक्की! या भूमिकेला भावनिक किनार तर आहेच शिवाय खूप शारीरिक तयारी करणेही गरजेचे आहे. तसेच मला मस्क्युलर आणि काहीसे मोठे दिसावे लागणार आहे. यासाठी मी किकबॉक्सिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. मला वजन कमी करायचे असले तरी मसल वाढवताना काटकपणा राखायचा आहे. म्हणूनच माझ्या प्रशिक्षकाने माझ्या नेहमीच्या व्यायामाला स्ट्रेंथ ट्रेनिंगची जोड दिली आहे'.