तुकारामांच्या रुपात दिसणार सुबोध भावे, 'संत तुकाराम' सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:12 IST2025-06-18T14:12:04+5:302025-06-18T14:12:51+5:30

'संत तुकाराम' हिंदी सिनेमाचं फर्स्ट पोस्टर रिलीज; सुबोध भावे साकारणार तुकारामांची भूमिका

sant tukaram hindi movie first poster out marathi actor subodh bhave to play lead role | तुकारामांच्या रुपात दिसणार सुबोध भावे, 'संत तुकाराम' सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

तुकारामांच्या रुपात दिसणार सुबोध भावे, 'संत तुकाराम' सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

संत तुकाराम यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'संत तुकाराम' या हिंदी सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'संत तुकाराम' सिनेमात मराठी अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. याबरोबरच 'संत तुकाराम' सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 

'संत तुकाराम' सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे तुकारामांच्या लूकमध्ये दिसत आहे. हातात वीणा घेऊन अभंग गात असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. "एक वाणी, एक विश्वास, एक संत तुकाराम महाराज", असं म्हणत सुबोधने त्याच्या सोशल मीडियावरुन 'संत तुकाराम' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर कमेंट करत चाहत्यांनी सिनेमासाठी उत्सुकता दर्शवली आहे. 'संत तुकाराम' सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केलं आहे. तर बी.गौतम कर्झन फिल्म्स आणि पुरशोत्तम स्टुडिओज यांची निर्मिती आहे. येत्या १८ जुलैला 'संत तुकाराम' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 


दरम्यान, याआधी संत तुकाराम यांची गाथा सांगणारे मराठी सिनेमे येऊन गेले आहेत. तुकाराम आणि संत तुकाराम या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. जितेंद्र जोशीने तुकाराम सिनेमात निभावलेली संत तुकारामांची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. आता सुबोध भावेला संत तुकारामांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: sant tukaram hindi movie first poster out marathi actor subodh bhave to play lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.