आलिया भटसोबत बायोपिक बनवणार भन्साळी; ही असेल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 18:00 IST2019-09-08T18:00:00+5:302019-09-08T18:00:02+5:30

‘इंशाअल्लाह’ बंद झाला असला तरी आलिया भटसोबत एक नवा चित्रपट बनवण्याची मात्र त्यांची योजना आहे.

sanjay leela bhansali will not start inshallah film with other actor |  आलिया भटसोबत बायोपिक बनवणार भन्साळी; ही असेल स्टोरी

 आलिया भटसोबत बायोपिक बनवणार भन्साळी; ही असेल स्टोरी

ठळक मुद्देआलिया सध्या ब्रह्मास्त्र, सडक 2 या चित्रपटांत बिझी आहे.

संजय लीला भन्साळींना सलमान खानची लुडबूड असह्य झाली आणि त्यांनी ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट थंडबस्त्यात टाकला. भन्साळी शाहरूख वा अन्य एखाद्या अभिनेत्याला घेऊन हा प्रोजेक्ट पुन्हा सुरु करतील, अशी आशा चाहत्यांना होती. पण असे काहीही नाही. होय, तूर्तास तरी ‘इंशाअल्लाह’ प्रोजेक्टवर काम करण्याचा भन्साळींचा कुठलाही इरादा नाही. पण हो, ‘इंशाअल्लाह’ बंद झाला असला तरी आलिया भटसोबत एक नवा चित्रपट बनवण्याची मात्र त्यांची योजना आहे. भन्साळींच्या जवळच्या सूत्रांचे मानाल तर, आलियाला घेऊन भन्साळी एक नवा चित्रपट बनवू इच्छितात. हा एक बायोपिक असेल.

‘इंशाअल्लाह’साठी सलमान व आलियाची जोडी या चित्रपटासाठी फायनल झाली होती. भन्साळीच्या टीमने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट घेतले होते. प्री-प्रॉडक्शनच्या कामात बराच पैसाही खर्च झाला होता. त्यामुळे कदाचित भन्साळी ‘इंशाअल्लाह’वर पुन्हा काम सुरु करतील, अशी अपेक्षा होती. पण आता ‘इंशाअल्लाह’ऐवजी एक नवाच प्रोजेक्ट भन्साळींनी हाती घेतला आहे. यात आलिया मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीत वाढलेल्या एका तरूणीचा संघर्ष दाखवला जाणार आहे. या बायोपिकची कथा पूर्ण झाली असून आता स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचे कळते. 

‘इंशाअल्लाह’च्या निमित्ताने भन्साळी पहिल्यांदा आलियासोबत काम करणार होते. पण त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. मात्र कुठल्याही परिस्थितीत आलियासोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. ‘इंशाअल्लाह’साठी आलियाने पुढील वर्षभरातील डेट्स ब्लॉक केल्या होत्या. याच डेट्स नव्या प्रोजेक्टसाठी वापरण्याचा भन्साळींचा विचार आहे.


आलिया सध्या ब्रह्मास्त्र, सडक 2 या चित्रपटांत बिझी आहे. सगळे काही जुळून आले तर यानंतर आलिया भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टचे काम सुरु करेल.

Web Title: sanjay leela bhansali will not start inshallah film with other actor