शाहरूखची लेक सुहाना खान भन्साळींच्या कंपूत! होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 08:19 IST2018-08-13T08:18:45+5:302018-08-13T08:19:36+5:30

सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे.

Sanjay Leela Bhansali to launch Suhana Khan in Bollywood? | शाहरूखची लेक सुहाना खान भन्साळींच्या कंपूत! होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग!!

शाहरूखची लेक सुहाना खान भन्साळींच्या कंपूत! होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग!!

करण जोहर आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या बड्या निर्माता-दिग्दर्शकांत स्टारकिड्सना लॉन्च करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून किंगखान शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगते आहे. किंगखानची मुलगी म्हटल्यावर साहजिकचं तिचे ग्रॅण्ड लॉन्चिंगचं होणार. पण हे लॉन्चिंग कोण करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तर आता त्याचीही चर्चा सुरु झालीय. ताजी बातमी खरी मानाल तर सुहानाला लॉन्च करण्याचा जिम्मा संजय लीला भन्साळी यांनी उचलला आहे.  सुहाना लॉन्चसाठी तयार आहे आणि कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. त्याची ही इच्छा भन्साळी पूर्ण करणार आहेत. खरे तर करण जोहर आणि सुजॉय घोष हे सुहानाला लॉन्च करणार, असेही म्हटले गेले होते. पण शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली. सूत्रांचे मानाल तर स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे. त्यामुळेही शाहरूखने लेकीच्या डेब्यूसाठी भन्साळींची निवड केली आहे. आता त्याची ही निवड सुहानासाठी किती यादगार ठरते ते बघूच.

काही दिवसांपूर्वी वोग इंडियासाठी सुहानाने तिचे पहिले फोटोशूट केले. या बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूटमध्ये सुहानाचा अंदाज नेक्स्ट सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

Web Title: Sanjay Leela Bhansali to launch Suhana Khan in Bollywood?