बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 10:19 IST2024-04-27T10:19:03+5:302024-04-27T10:19:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन (sanjay leela bhansali, ashish patil, heeramandi)

sanjay leela bhansali heeramandi webseries choreography by Ashish Patil for Bhansali | बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन

बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन

संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंंडी' वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री झळकणार आहेत. एक आनंदाची बातमी म्हणजे  या वेबसिरीजच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळा आशिष पाटीलने सांभाळली आहे. आशिषने सोशल मीडियावर नुकताच संजय लीला भन्साळींसोबतचा फोटो पोस्ट केलाय.  हा फोटो पोस्ट करुन आशिषने एक खास पोस्ट  लिहिली आहे.

आशिष लिहितो, "संजय लीला भन्साळी.. कोण म्हणतं स्वप्नं पूर्ण होणं शक्य नाही. माझं स्वप्न नुकतंच खरं झालं. दिग्गज चित्रपट निर्माते श्री संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहिले होते आणि गेल्या वर्षी त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात आले. त्या क्षणी माझ्या हृदयात आणि मनात काय चालले होते ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप भारावून गेलो होतो. मी त्यांना भेटलो तेव्हा ते खूप नम्र आणि मृदुभाषी होते; आणि मी तर उत्साहाने थरथरत होतो."

 


आशिष पुढे लिहितो, "त्यांची उत्कृष्ट कलाकृती 'हीरामंडी' मधील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी मला दिलेल्या आयुष्यभराच्या या अद्भुत संधीबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानू शकत नाही. हिरामंची 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे (NETFLIX). सर तुम्ही परिपूर्णता आणि नम्रतेचे प्रतीक आहात; आणि तुमच्यासोबत काम करून तुमचे मार्गदर्शन आणि कौशल्य मला मिळाले हे माझं खरोखरच भाग्य आहे. तुम्हांला मनापासून प्रेम आणि आदर.  धन्यवाद आणि माझ्या सर्व हितचिंतकांचे.."

Web Title: sanjay leela bhansali heeramandi webseries choreography by Ashish Patil for Bhansali