या अभिनेत्रींसोबत होते संजय कपूरचे अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 10:30 IST2018-01-18T05:00:45+5:302018-01-18T10:30:45+5:30
संजय कपूर सध्या दिल संभल जा जरा या मालिकेत काम करत आहे. संजयने अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...
.jpg)
या अभिनेत्रींसोबत होते संजय कपूरचे अफेअर
स जय कपूर सध्या दिल संभल जा जरा या मालिकेत काम करत आहे. संजयने अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला बॉलिवूडमध्ये काही यश मिळवता आले नाही. तो अनेक वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होता. त्याने आता छोट्या पड्यावर आपले नशीब आजमावयचे ठरवले आहे. पण छोट्या पडद्यावर देखील त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. संजयची ही मालिका टिआरपी रेसमध्ये देखील मागे पडलेली दिसत आहे. संजय कपूरचे व्यवसायिक आयुष्य कधीच चर्चेत राहिले नाही. पण त्याचे वैयक्तिक आयुष्य मीडियात नेहमीच चर्चिले गेले आहे.
संजय कपूरने २००२ला महिप सिंधूसोबत लग्न केले. महिप ही एक एनआरआय असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. बॉलिवूड अभिनेत्यांच्या ग्लॅमरस पत्नींमध्ये तिची गणना केली जाते. महिप अनेक वेळा बॉलिवूडच्या पार्टींमध्ये तिच्या पतीसोबत पाहायला मिळते. महिपचा ज्वेलरीचा बिझनेस असून त्यांना दोन मुली आहेत. महिप ही बॉलिवूडमधील नसली तरी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत तिची खूप चांगली मैत्री आहे. ती हृतिक रोशनची पत्नी सुझान खान, सोहेल खानची पत्नी सीमा खान यांच्यासोबत मुंबईत एक बुटीक चालवते. तुम्हाला माहीत आहे का, महिपसोबत लग्न करण्याआधी संजय कपूरचे बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअर होते. संजय कपूरच्या या दोन्ही अफेअरची चांगलीच चर्चा मी़डियात रंगली होती. प्रेम या चित्रपटात आपल्याला तब्बू आणि संजय कपूर यांची जोडी पाहायला मिळाली होती. त्या दोघांच्या जोडीची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. याच चित्रपटाच्या वेळी त्या दोघांचे अफेअर सुरू झाल्याचे म्हटले जात होते. पण काहीच महिन्यात ते दोघे वेगळे झाले.
![sanjay kapoor tabu]()
त्यानंतर सिर्फ तुम या चित्रपटाच्या वेळी सुश्मिता सेन आणि संजयचे अफेअर सुरू झाले. या अफेअरबाबत देखील संजयने मौनच राखणे पसंत केले होते. संजय आणि सुश्मिताचे नाते देखील काहीच काळ टिकले. दोन अयशस्वी नात्यानंतर संजय महिपच्या प्रेमात पडला. महिमला पाहाताच क्षणी तो तिच्यामागे वेडा झाला होता. त्याने काहीच दिवसांत तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
![sanjay kapoor sushmita sen]()
Also Read : हा अभिनेता सांगतोय, मी आहे अनिल कपूरपेक्षा फिट