संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 10:03 IST2020-02-08T09:59:13+5:302020-02-08T10:03:03+5:30

संजय दत्तची मुलगी त्रिशला मात्र यासाठी अपवाद ठरते. मात्र त्रिशलाची बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याची इच्छा असूनही तिला लांब ठेवण्यात आले.

Sanjay Dutt's Daughter Trishala Dutt Dreams Of Becoming An Actress, but ....... | संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण.......

संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण.......

संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे. ती सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत आहे. त्या फोटोंमध्ये अनेक बोल्ड फोटोंचा समावेश आहे. त्रिशालाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत असते. बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देईल असे तिचे सौंदर्य आहे. सतत ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पण त्रिशालाने नेहमीच लोकांपासून आणि बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहीली. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या स्टार कलाकारांपेक्षा स्टार किड्सची जास्त चर्चा ऐकायला मिळते आहे. अशातच संजय दत्तची मुलगी त्रिशला मात्र यासाठी अपवाद ठरते. मात्र त्रिशलाची बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याची इच्छा असूनही तिला लांब ठेवण्यात आले.  


त्रिशालालाही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण संजय दत्तने असं होऊ दिलं नाही. संजयला त्रिशालाने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी इच्छा होती. तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि तिने त्यातच करिअर करावं असं त्याला वाटत होतं. त्यात बॉलिवूड अभिनेत्री होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते हिंदी. त्यात अमेरिकन भाषेतले हिंदी उच्चार इथे चालणार नाहीत. तिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल म्हणून संजय दत्तने त्रिशलाचे स्पप्न पूर्ण होऊच दिले नाही. अभिनेत्री नाही बनता आले म्हणून ती थांबली नाही. ती  अनेक फॅशन ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत असते.


त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिल पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. संजय दत्तने १९८७ साली ऋचासोबत लग्न केले होते. लग्नाच्या वर्षभरातच त्रिशाला त्यांच्या आयुष्यात आली. १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरने ऋचाचे निधन झाले.

Web Title: Sanjay Dutt's Daughter Trishala Dutt Dreams Of Becoming An Actress, but .......