संजय दत्त मुलगी त्रिशालाचा बर्थ डे असा बनवणार 'खास'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 12:49 IST2017-07-28T05:32:23+5:302017-07-28T12:49:35+5:30

संजय दत्तच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर संजय दत्त मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट भूमीचा ...

Sanjay Dutt will make 'Birth Day' as a special birthday! | संजय दत्त मुलगी त्रिशालाचा बर्थ डे असा बनवणार 'खास'!

संजय दत्त मुलगी त्रिशालाचा बर्थ डे असा बनवणार 'खास'!

जय दत्तच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर संजय दत्त मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट भूमीचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर लवकरच त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज होणार आहे. संजय दत्तची मुलगी त्रिशालाच्या बर्थ डे च्या दिवशी भूमीचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. त्रिशालाचा बर्थ डे 10 ऑगस्टला आहे. आणखीन 2 आठवड्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा निर्माता संदीप सिंगने मिड-डे दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीला दुजोरा दिला आहे. संदीप म्हणाला, ''भूमीचा ट्रेलर संजय दत्तच्या बर्थ डे च्या दिवशी रिलीज करण्याचा आम्ही ठरवले होते. मात्र संजयला हा ट्रेलर त्रिशालाच्या बर्थ डेला रिलीज करुन तिचा बर्थ डेला स्पेशल बनवायचा आहे. त्रिशाला संजय दत्तची मोठ्या पडद्यावर परतण्याची वाट खूप दिवसांनी पासून बघते आहे. म्हणून संजयला हा ट्रेलर तिच्या वाढदिवसाला रिलीज करायचा आहे. पुढे जाऊन संदीप म्हणाला ''संजय दत्त आपल्या दोन्ही मुलींच्या त्रिशाला आणि इकराच्या खूपच क्लोज आहे. हा चित्रपट त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना डेडीकेट केला आहे.''  भूमीची कथा बाप-लेकीच्या संबंधावर आधारित आहे. त्यामुळे कदाचित त्यांना हा चित्रपट आपल्या दोन्ही मुलींना डेडीकेट केला असावा. भूमीत संजय दत्त शिवाय आदिती राव हैदरी झळकणार आहे.

ALSO READ : संजय दत्तच्या ‘भूमी’चा फर्स्ट लूक आऊट! 

राजकुमार हिराणी संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करतो आहे. यात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकरतो आहे. रणबीरसह या चित्रपटात अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि मनीषा कोईराला यांच्या ही भूमिका आहेत. मार्च 2018 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Sanjay Dutt will make 'Birth Day' as a special birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.