संजय दत्तच्या प्रकृतीबाबत समोर आली नवी माहिती, कुटुंबाने केला खुलासा
By रूपाली मुधोळकर | Updated: October 20, 2020 10:31 IST2020-10-20T10:23:08+5:302020-10-20T10:31:03+5:30
संजय दत्तचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

संजय दत्तच्या प्रकृतीबाबत समोर आली नवी माहिती, कुटुंबाने केला खुलासा
बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्त याचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कॅन्सरने ग्रस्त असलेला संजय लवकरच या आजारावर मात करणार आहे. संजयच्या कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तिने हा खुलासा केला आहे. संजय उपचारास योग्य प्रतिसाद देत असून तो लवकरच बरा होईल, असे या व्यक्तिने सांगितले.
संजयजवळ केवळ सहा महिने आहेत, अशी बातमी मध्यंतरी आली होती. संजयच्या जवळच्या व्यक्तिने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या व्यक्तिने संजय वेगाने रिकव्हर होत असल्याचा दावा केला. कालपरवा संजयच्या काही चाचण्या झाल्यात आणि त्याचे निष्कर्ष चांगले आहेत. परमेश्वराची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने संजय उपचाराला उत्तम प्रतिसाद देतोय. तो लवकरच यातून बाहेर पडेल, असे या व्यक्तिने सांगितले.
काही दिवसांपूर्वी संजयला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. संजूने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती फॅन्सना दिली होती. सुरुवातीला जेव्हा संजय दत्तचे रिपोर्टसमोर आले तेव्हा त्याला धक्का बसला होता काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला.
अलीकडे शेअर केला होता व्हिडीओ
अलीकडे संजयचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात संजयने कॅन्सरला पराभूत करण्याचे म्हटले होते. मी त्याला पराभूत करीन. लवकरच कॅन्सर मुक्त होईल, असे संजय या व्हिडीओत म्हणताना दिसला होता.
हेअर स्टाइलिस्ट अलिम हकीमने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत संजय सलूनमध्ये होता आणि नवी हेअरकट केल्यानंतर त्याने या व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. ‘हाय, मी संजय दत्त. सलूनमध्ये परत आल्यावर छान वाटले. मी केस कापण्यासाठी आलो आहे. पण तुम्ही पाहू शकत असाल तर हे माझ्या आयुष्यातला नवीन डाग आहे. पण मी लवकरच कॅन्सरला हरवेन,’असे संजय व्हिडीओत म्हणाला होता.
सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा
कॅन्सरचे निदान होण्याआधी संजयने अनेक सिनेमे साईन केले आहेत. यापैकी काही सिनेमांचे शूटींग पूर्ण झाले आहे तर काहींचे बाकी आहे. ‘केजीएफ 2’ या सिनेमात संजय दिसणार आहे. साऊथच्या सुपरडुपर हिट सिनेमाच्या या सीक्वलमध्ये संजय निगेटीव्ह रोलमध्ये आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग बाकी असल्याचे कळतेय. ‘तोरबाज’ या सिनेमात अफगाणिस्तानची कथा पाहायला मिळणार आहे. गिरीश मलिक दिग्दर्शित या सिनेमात संजू आर्मी आॅफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात संजयसोबत नरगिस फाखरी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. ‘भुज : द प्राइड आॅफ इंडिया’ या अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. पण संजय दत्तची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘शमशेरा’ या यशराज बॅनरच्या सिनेमात संजू रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा सिनेमाची घोषणा झालीय. काही भागांचे शूटींग झालेय. पण बरेच शूटींग बाकी आहे.
याशिवाय ‘पृथ्वीराज’ या सिनेमातही संजय प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बरेच शूटिंग बाकी आहे.
या सर्व सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा लागला आहे. संजयच्या आजारापणामुळे यापैकी काही सिनेमे कसे पूर्ण होतील, हे कळायला मार्ग नाही.
दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत