वेळ बदलते आहे, दोनही मुलांचा फोटो शेअर करत मान्यताने केली देवाला प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 11:19 IST2020-08-26T11:14:39+5:302020-08-26T11:19:40+5:30

संजय दत्तचे कुटुंब तिच्या आजाराला घेऊन खूप चिंतेत आहे.

Sanjay dutt wife manyata dutt pens down heartfelt note with picture of their kids | वेळ बदलते आहे, दोनही मुलांचा फोटो शेअर करत मान्यताने केली देवाला प्रार्थना

वेळ बदलते आहे, दोनही मुलांचा फोटो शेअर करत मान्यताने केली देवाला प्रार्थना

संजय दत्तचे कुटुंब तिच्या आजाराला घेऊन खूप चिंतेत आहे. संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सर झाला आहे. लवकरच तो पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. नुकतेच मान्यता दत्तने मुलांसोबतचा फोटो शेअर करत एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर संजय दत्तची मुलगी त्रिशालाने देखील कमेंट केली आहे. 

मान्यता दत्तने इन्स्टाग्रामवर दोनही मुलांचे फोटो शेअर केले आहे. यात संजय दत्तची दोनही मुलं हसताना दिसतायेत. या फोटो शेअर करताना मान्यता दत्तने लिहिले की, वेळ बदलते आहे. देव तुमच्या शांततेचे रक्षण करो.. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल. #love #grace #positivity #dutts #ganpatibappamorya #beautifullife #thankyougod.' असे हॅशटॅग तिने वापरले आहेत. त्रिशालाने मान्यता दत्तच्या फोटोवर कमेंट करताना हात जोडले आहे.

 लॉकडाऊनमध्ये मान्यता दत्त मुलांसोबत दुबईमध्ये अडकली होती. मात्र संजय दत्तच्या आजाराबाबत कळल्यावर ती मुलांना घेऊन भारतात परतली. 

 

अमेरिकेतील मेमोरियल स्लोआन कॅटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये संजय दत्त उपचारासाठी जाणार आहे. संंजय दत्तची आई नर्गिस 1980 ते 1981 दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. जेथे त्याच्यावर स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे उपचार झाले होते. संजय दत्तसोबत त्याची पत्नी मान्यता बहीण प्रियापण सोबत जाण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Sanjay dutt wife manyata dutt pens down heartfelt note with picture of their kids