या अभिनेत्रीसोबत संजय दत्त अनेक वर्षं होता नात्यात, आईच्या मृत्युनंतर तिने घेतली होती ती खास जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 14:42 IST2019-06-17T14:36:17+5:302019-06-17T14:42:15+5:30

संजयचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

Sanjay Dutt was having in relationship with Tina Munim | या अभिनेत्रीसोबत संजय दत्त अनेक वर्षं होता नात्यात, आईच्या मृत्युनंतर तिने घेतली होती ती खास जागा

या अभिनेत्रीसोबत संजय दत्त अनेक वर्षं होता नात्यात, आईच्या मृत्युनंतर तिने घेतली होती ती खास जागा

ठळक मुद्देमला नेहमीच कोणाच्या ना कोणाच्यातरी आधाराची गरज लागते. माझ्या आईचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. तिच्या निधनानंतर ती जागा टीनाने घेतली. तिने माझ्या अनेक निर्णयात मला साथ दिली.

संजय दत्तच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्याचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखे होते असे त्यानेच मान्य केले आहे. संजू या चित्रपटाद्वारे खऱ्या आयुष्यातील संजय दत्त कसा होता हे आपल्याला जाणून घेता आले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक मुली आल्या असा उल्लेख त्याने या चित्रपटात केला आहे. त्याच्या प्रेयसींची संख्या ही अतिशय जास्त होती.

संजयचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि त्याचे अनेक वर्षं अफेअर होते. ते दोघे लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असताना त्या दोघांचे ब्रेकअप झाले. तुम्हाला माहीत आहे का, माधुरी संजयच्या आयुष्यात येण्याआधी तो अनेक वर्षं एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. त्याने ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये देखील कबूल केली आहे. 

स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत संजूने सांगितले होते की, माझ्या आईच्या निधनानंतर आम्ही सगळेच खूप खचलो होतो. घरी जाण्याची इच्छा देखील व्हायची नाही. पण टीना मला घरी जायला लावायची. मी खूप भावनाप्रधान व्यक्ती आहे. त्यामुळे मला नेहमीच कोणाच्या ना कोणाच्यातरी आधाराची गरज लागते. माझ्या आईचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. तिच्या निधनानंतर ती जागा टीनाने घेतली. तिने माझ्या अनेक निर्णयात मला साथ दिली. पण तिने कोणताही निर्णय माझ्यावर लादला नाही. तिच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींसोबत काम करण्यास तिने मला कधीच थांबवले नाही. मी तिच्याबाबत खूपच पझेसिव्ह होतो आणि त्यामुळे ती चित्रपटांमध्ये काय कपडे घालतो याकडे मी लक्ष द्यायचो. पण तिच्या करियरमध्ये मी कधीच हस्तक्षेप केलेला नाही. 

संजय आणि टीना यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर ब्रेकअप केले. टीना मुनिम आता अनिल अंबानी यांची पत्नी आहे तर संजूचे लग्न मान्यतासोबत झाले आहे. ते दोघे आपापल्या आयुष्यात प्रचंड खूश आहेत. 

 

Web Title: Sanjay Dutt was having in relationship with Tina Munim