कॅन्सरला मात दिल्यानंतर समोर आला संजय दत्तचा पहिला फोटो, कोकिलाबेन हॉस्पिटलमधून परतला घरी
By गीतांजली | Updated: October 22, 2020 14:56 IST2020-10-22T13:51:26+5:302020-10-22T14:56:52+5:30
कॅन्सरवर मात देऊन अभिनेता संजय दत्त कोकिलाबेन हॉस्पिटलमधून घरी परतला आहे.

कॅन्सरला मात दिल्यानंतर समोर आला संजय दत्तचा पहिला फोटो, कोकिलाबेन हॉस्पिटलमधून परतला घरी
कॅन्सरवर मात देऊन अभिनेता संजय दत्त कोकिलाबेन हॉस्पिटलमधून घरी परतला आहे. बुधवारी (काल) बहीण प्रिया दत्तसोबत तो घराबाहेर दिसला. यावेळी संजूने पिंक रंगाचा कुर्ता आणि पायजामा घातला होता. मीडियाचे कॅमेरा बघून संजय दत्तने हसत आपला हात त्यांच्या दिशेने हलवला.
मुलांच्या वाढदिवसाला व्हिडीओ कॉलव्दारे सामील झाला.
संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला जुळी मुली शाहरान आणि इकराच्या 10व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होता. ज्यात संजय दत्त व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सामील झाला होता. मान्यता आणि दोनही मुलं सध्या दुबईत आहेत.
बुधवारी संजय दत्तने दिली होती हेल्थची अपडेट
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. संजयने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना माझं मन आनंदाने भरलं आहे. धन्यवाद!
संजय दत्तने नोटमध्ये लिहिले की, 'गेले काही आठवडे मी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना देव हा सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आणि आज माझ्या मुलांच्या वाढदिवसावर मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी त्यांना आरोग्य आणि आमच्या परिवाराच्या चांगल्यासाठी हे सर्वात चांगलं गिफ्ट देऊ शकलो. हे सगळं तुमच्या विश्वासामुळे आणि सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. मी मनपासून सर्वांचा आभारी आहे. जे या कठिण काळात माझ्यासोबत उभे राहिले आणि माझी ताकद झालेत. मला इतकं प्रेम, दया आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार'.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला कॅन्सरबाबत समजलं होतं. त्याने मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कीमोथेरपी केली होती. त्यानंतर संजयने लगेच 'शमशेरा' आणि 'केजीएफ चॅप्टर २' चं शूटींग सुरू केलं होतं.