हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 09:28 IST2026-04-03T09:26:38+5:302026-04-03T09:28:41+5:30

कॉकटेलमध्ये जिवंत मासा, संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधला घाणेरडा प्रकार, सोशल मीडियावर ट्रोल होताच मेन्यू बदलला

sanjay dutt newly opened restaurant in mumbai served live fish cocktail removed menu after trolling | हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप

हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप

एकीकडे धुरंधर २मुळे सगळीकडे संजय दत्तची हवा असताना दुसरीकडे मात्र अभिनेता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण, यावेळी कुठलं गाणं किंवा सिनेमामुळे संजय दत्त ट्रोल होत नाहीये. तर याला कारण ठरलंय त्याचं नव्यानेच सुरू झालेलं रेस्टॉरंट. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तने त्याच्या मित्रासोबत 'अल्ता स्टेला' नावाचं रेस्टॉरंट-बार सुरू केलं होतं. मात्र या रेस्टॉरंटमधील एका कॉकटेलमुळे खळबळ उडाली आहे. जिवंत मासा असलेलं कॉकटेल या रेस्टॉरंटमध्ये दिलं जातं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

'एबिसु कॉकटेल' नावाच्या या ड्रिंकमध्ये जिवंत मासा असतो आणि वरच्या बाजूला आग लावली जाते. 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आलेल्या कॉकटेलच्या व्हिडीओमध्येही हे ड्रिंक दिसलं होतं. पण एका इन्फ्लुएन्सरच्या व्हिडीओत हे जिवंत मासा असलेलं कॉकटेल दिसल्याने संताप व्यक्त होतो आहे. अनेकांनी कमेंट करत यावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंटमध्ये डेकोरेशनसाठीही टेबलावर जिवंत मासे ठेवण्यात येत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. यानंतर संजय दत्तच्या रेस्टॉरंट मेन्यूमधून 'एबिसु कॉकटेल' हे ड्रिंक काढून टाकण्यात आलं आहे. 


रेस्टॉरंटच्या सोशल मीडियावरुन एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की "आम्हाला तुमची काळजी कळते, आमच्याकडून नेहमीच प्राण्यांच्याबाबत पूर्ण काळजी घेतली जाते. 'एबिसु कॉकटेल' हे मीन राशीपासून प्रेरित ड्रिंक होतं. बेटा फिश हे फायटर फिश म्हणूनही ओळखलं जातं. बेटा फिश हे तळातूनही श्वास घेऊ शकतात. म्हणूनच त्यांना एकटं ठेवलं जातं. पण कॉकटेलमध्ये जिवंत माशाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळेच आम्ही हे ड्रिंक यापुढे सर्व्ह न करण्याचा निर्णय घेतला आहे". 


संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधील या धक्कादायक प्रकारानंतर अॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांनीही विरोध केला आहे. एवढंच नव्हे तर जॅकनिल फर्नांडिसनेही यावर आक्षेप घेतला आहे. माश्यांचा अशाप्रकारे छळ केला जाणे, हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title : संजय दत्त के रेस्टोरेंट में जीवित मछली कॉकटेल पर विवाद।

Web Summary : संजय दत्त का नया रेस्टोरेंट, 'अल्टा स्टेला', जीवित मछली के साथ कॉकटेल परोसने के कारण विवादों में है। 'एबिसु कॉकटेल' का वीडियो वायरल होने के बाद आक्रोश फैल गया। आलोचना के बाद, रेस्टोरेंट ने मेनू से ड्रिंक हटा दिया।

Web Title : Sanjay Dutt's restaurant faces backlash over live fish cocktail.

Web Summary : Sanjay Dutt's new restaurant, 'Alta Stella,' is under fire for serving a cocktail with a live fish. The 'Ebiscu Cocktail' sparked outrage after a video went viral. Following criticism, the restaurant removed the drink from its menu.