‘मी पहिला श्वास घेतला अन् लोकांनी मला...’; संजय दत्तची लेक त्रिशाला का म्हणाली असं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:09 PM2021-06-21T15:09:27+5:302021-06-21T15:10:14+5:30

Sanjay Dutt daughter Trishala Dutt : ग्लॅमरसच्या झगमटापासून दूर असली तरी त्रिशाला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

Sanjay Dutt daughter Trishala Dutt said that she has been judged since childbirth | ‘मी पहिला श्वास घेतला अन् लोकांनी मला...’; संजय दत्तची लेक त्रिशाला का म्हणाली असं ?

‘मी पहिला श्वास घेतला अन् लोकांनी मला...’; संजय दत्तची लेक त्रिशाला का म्हणाली असं ?

googlenewsNext
ठळक मुद्देत्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे.

संजय दत्तची (Sanjay Dutt)  लेक त्रिशाला दत्त (Trishala Dutt) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरसच्या झगमटापासून दूर असली तरी त्रिशाला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडे तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशल ठेवले. या सेशनमध्ये त्रिशाला  पर्सनल लाईफबद्दल बोलली. मी पहिला श्वास घेतला आणि तेव्हापासून लोकांनी मला जज करायला सुरूवात केली, असे ती म्हणाली. (Sanjay Dutt daughter Trishala Dutt )

जजमेंटल लोकांसोबत कशी डील करतेस? असा सवाल एका चाहत्याने तिला विचारला, यावर ‘दुर्दैवाने या जगात आले आणि लोकांनी मला जज करण्यास सुरूवात केली. फॅमिली नेममुळे लोकांनी मला जज करण्याची एकही संधी सोडली नाही,’ असे त्रिशाला म्हणाली.
लोक का जज करतात, याचे कारणही तिने सांगितले. ती म्हणाली, जेव्हा आपण स्वत:वर नाशुख असतो वा आपल्या आयुष्याबद्दल नाखुश असतो तेव्हा आपल्या आजुबाजूच्या लोकांना जज करायला लागतो. त्यांचे दोष दाखवायला, त्यांच्यावर टीका करायला लागतो. प्रत्येकाचा सन्मान करा, दयाभाव ठेवा. अगदी जे तुम्हाला जज करतात, त्यांचाही आदर करा. यातून आपण शिकतो, घडतो, असेही ती म्हणाली.

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे. 2014 मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय.
1987 मध्ये संजय दत्तने ऋचा शमार्सोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म 1988 मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने 10 डिसेंबर 1996 मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.

Web Title: Sanjay Dutt daughter Trishala Dutt said that she has been judged since childbirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.