"ज्यांनी मर्डर केलाय त्या कैद्यांसोबत मिळून मी..."; संजय दत्तचा मोठा खुलासा, तुरुंगात असताना कमवायचा पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:29 IST2025-09-07T14:28:21+5:302025-09-07T14:29:29+5:30
संजय दत्त तुरुंगात कशी कमाई करायचा, याचा खुलासा त्याने कपिल शर्मा शोमध्ये केलाय. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"ज्यांनी मर्डर केलाय त्या कैद्यांसोबत मिळून मी..."; संजय दत्तचा मोठा खुलासा, तुरुंगात असताना कमवायचा पैसे
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हा अनेकांचा आवडता अभिनेता. संजय दत्तने त्याच्या आयुष्यात एकदा तुरुंगाची हवा सुद्धा खाल्ली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगताना संजूबाबाने तुरुंगवास भोगला होता. परंतु तुरुंगात असतानाही तो कमाई करायचा. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये संजूबाबाने तुरुंगात मिळवलेल्या कमाईबद्दल सांगितले. संजूबाबा तुरुंगात असताना कशी कमाई करायचा? जाणून घ्या.
संजय दत्त तुरुंगात अशी करायचा कमाई
संजय दत्तने कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं की, तुरुंगात असताना तो खुर्च्या आणि कागदी पिशव्या बनवत असे. तसंच संजूबाबा तुरुंगात असताना स्वतःचा रेडिओ शो चालवायचा. याशिवाय अभिनेत्याने एक नाटक कंपनी निर्माण केली होती. या नाटक कंपनीमध्ये संजूबाबा स्वतः दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळायचा. त्यावेळी खून करुन शिक्षा भोगत असलेले कैदी संजूबाबाच्या या नाटकात काम करायचे. तुरुंगातील आरोपींसोबत मिळून संजूबाबा नाटकाची गोष्ट लिहायचा. संजय दत्तला त्याच्या या कामांसाठी जेलमध्ये असताना पगार मिळायचा, असा खुलासा त्याने केला.
संजय दत्त पुढे म्हणाला की, तुरुंगात असताना हे पैसे कमावणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. हे पैसे मिळवण्यामागे त्याचे दोन उद्देश होते. पहिलं म्हणजे, पैसे त्याच्यासाठी दुय्यम गोष्ट होती. त्याला कोणत्या ना कोणत्या कामात यानिमित्त व्यस्त राहायचे होते. दुसरं म्हणजे, त्याला स्वावलंबी बनून काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. त्याने जमा केलेले पैसे त्याने त्याची पत्नी मान्यता दत्तला दिले होते. अशाप्रकारे संजय दत्तने भावुक खुलासा कपिल शर्मा शोमध्ये केला. संजय दत्तची खलनायकी भूमिका असलेला 'बागी ४' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे.