शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाची भावुक पोस्ट, म्हणाली - "तुम्ही कधी विचारही केलेला नसतो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:13 IST2024-02-02T13:12:07+5:302024-02-02T13:13:25+5:30

" आयुष्यात तुम्ही हजारो गोष्टींचा सामना करता, पण...", शोएबने सनाशी निकाह केल्यानंतर सानियाची पोस्ट

sania mirza shared emotional post after shoaib malik third marriage with sana javed | शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाची भावुक पोस्ट, म्हणाली - "तुम्ही कधी विचारही केलेला नसतो..."

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाची भावुक पोस्ट, म्हणाली - "तुम्ही कधी विचारही केलेला नसतो..."

भारताची स्टार टेनिसपट्टू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने पहिल्यांदाच पोस्टद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "आयुष्यात तुम्ही हजारो गोष्टींचा सामना करत असता, ज्याबद्दल लोकांना काहीच माहीत नसतं. असे प्रसंगही येतात ज्यामुळे तुम्हाला धक्का बसतो, तुमच्यात बदल होतो, तुम्ही कोलमडून पडता. पण, या गोष्टी तुम्हाला जास्त ताकदवान बनवतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. त्यामुळे पुढच्या वेळेस जर कोणी त्यांना दिसतंय त्यावरुन तुमच्याबद्दल मत बनवत असेल, तर लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात. तुम्ही कोणत्या गोष्टींवर मात केलेली आहे ते आठवा. स्माइल करा आणि पुढे जात राहा. कारण, तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही आधीच तुम्हाला सिद्ध केलेलं आहे. तुम्ही त्या वादळांचा सामना केलेला आहे, जे लोकांनी पाहिलेलं नाही. कारण, तुम्ही ते कधीच कोणाला दाखवलेलं नाही." 

सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी २०१०मध्ये निकाह करत संसार थाटला होता. तेव्हा सानियाला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं होतं. १४ वर्षांनंतर सानियाने मुस्लीम पद्धतीने खुला करत शोएबशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना इझहान हा मुलगा आहे. शोएबबरोबर सानियाचं दुसरं लग्न होतं. सानियाआधी त्याने आयेशा सिद्दीकी या भारतीय महिलेशी विवाह केला होता. 
 

Web Title: sania mirza shared emotional post after shoaib malik third marriage with sana javed