​सना खानची डायरेक्टरशी इतकी कशी वाढली जवळीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:50 IST2016-12-07T12:50:23+5:302016-12-07T12:50:23+5:30

‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेली सना खान सध्या ‘वजह तुम हो’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात सनाने कधी ...

Sana Khan's director was so close to the director? | ​सना खानची डायरेक्टरशी इतकी कशी वाढली जवळीक?

​सना खानची डायरेक्टरशी इतकी कशी वाढली जवळीक?

िग बॉस’मधून चर्चेत आलेली सना खान सध्या ‘वजह तुम हो’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात सनाने कधी नव्हे इतकी बोल्ड दृश्ये दिली आहेत. पण या बोल्ड दृश्याइतकेचीच या चित्रपटाच्या डायरेक्टरशी वाढलेल्या जवळीकीमुळे सना चर्चेत आहे. होय, ‘वजह तुम हो’चे डायरेक्टर म्हणजे कोण, तर विशाल पंड्या. सध्या विशाल पंड्या व सना खान एकमेकांना डेट करीत असल्याची खबर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकाच गाडीतून येतात जातात. इतकेच नाही तर गाडीत एकत्रच कपडेही बदलतात. गाडीत एकत्र येण्या-जाण्याइतपत ठीक आहे. पण गाडीत एकत्र कपडे बदलण्याच्या गोष्टीवर खरे तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अलीकडे एका इव्हेंटदरम्यान असेच काही दृश्य पाहायला मिळायले. सना व विशाल एकाच गाडीतून आले.  आधी ते वेगळ्या कपड्यांमध्ये होते. पण गाडीतून बाहेर येतांना त्यांचे कपडे बदललेले दिसले. सना आणि विशाल दोघेही बदललेल्या कपड्यांसह गाडीतून बाहेर पडले. त्यामुळेच सध्या सना व विशाल यांच्या डेटींगच्या बातम्यांची सध्या बॉलिवूडमध्ये जोरात चर्चा आहे.

अर्थात सनाने या बातम्यांचा इन्कार केला आहे. डेटींगसारखे आमच्यात काहीही नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे सनाने म्हटले आहे. आता एकीकडे सना डेटींगच्या बातम्या नाकारते आहे, तर दुसरीकडे विशाल पंड्या सनाची तारीफ करताना थकत नाहीये. कुणीही तुमच्यासाठी काही ना काही करून तुम्हाला खूश करू शकेल. मात्र सना काहीही न करता तुम्हाला खूश करू शकते. तिच्या केवळ एका हास्याने मन आनंदी होते, असे विशाल पंंड्या सध्या सांगत आहे.  

Web Title: Sana Khan's director was so close to the director?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.