समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 15:50 IST2020-03-16T15:48:17+5:302020-03-16T15:50:34+5:30

समीरा रेड्डीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

sameera reddy shares her daughters cute video PSC | समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ

समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ

ठळक मुद्देसमीरा रेड्डीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिची लेक उभी राहाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. माझ्या मुलीला उभी राहाण्याची चांगलीच घाई लागली असल्याचे तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

समीरा रेड्डीने काही वर्षांपूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तिने लग्न झाल्यानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला. दोन मुलांची आई असलेली समीरा सध्या केवळ चर्चेत असते ती तिच्या फोटो वा व्हिडीओमुळे. समीरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. समीराच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला सध्या तिच्या मुलीचे अनेक फोटो, व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. या फोटो आणि व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

समीरा रेड्डीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिची लेक उभी राहाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. माझ्या मुलीला उभी राहाण्याची चांगलीच घाई लागली असल्याचे तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

समीराच्या मुलीचे नाव नायरा असून ती खूपच क्यूट आहे. समीराने गेल्या 12 जुलैला नायराला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य असून तिला एक मुलगा देखील आहे. इन्स्टाग्रामला तिच्या मुलाचे फोटो, व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते. 

नायराच्या जन्मापासून समीरा चांगलीच चर्चेत आहे. समीराने ती केवळ अडीज महिन्यांची असताना तिच्यासोबत कर्नाटकातील सर्वात उंच शिखर सर केले होते. तिने एक व्हिडिओ शेअर करत याविषयी सांगितले होते. तिने व्हिडिओद्वारे सांगितले होते की, मी नायरासोबत Mullayanagiri शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मी एका ठिकाणी थांबले. कारण मला श्वास घ्यायला त्रास होत होता. 6300 फूट उंचीचे हे कर्नाटकातील सर्वात उंच शिखर आहे. अनेक न्यू मॉम्सचे मॅसेज येत आहेत. त्या माझ्यामुळे ट्रॅव्हल करण्यास प्रेरित झाल्या आहेत. माझ्या ट्रॅव्हल स्टोरीजला मिळालेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी भारावले आहे. बाळाच्या जन्मानंतर थकले असे म्हणणे सोपे असते. पण मी असे न म्हणण्याचा निश्चय केला होता. मी माझ्या मुलीची संपूर्ण काळजी घेतेय.

Web Title: sameera reddy shares her daughters cute video PSC