Same to Same... फसलात ना...! हा सलमान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा आहे त्याचा डुप्लिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 19:00 IST2019-08-11T19:00:00+5:302019-08-11T19:00:00+5:30

सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता बॉलिवूडचा दबंग खान सलमानचाही उल्लेख करावा लागेल.

Same to Same ... Salman Khan Body Double Parvez Kazzi | Same to Same... फसलात ना...! हा सलमान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा आहे त्याचा डुप्लिकेट

Same to Same... फसलात ना...! हा सलमान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा आहे त्याचा डुप्लिकेट

एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशाच सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता बॉलिवूडचा दबंग खान सलमानचाही उल्लेख करावा लागेल. मात्र सलमानचा हा डुप्लिकेट त्याच्या चित्रपटांमध्ये बॉडी डबल म्हणून काम करतो. 

सलमान त्याच्या चित्रपटात अॅक्शन व परफॉर्म करताना दिसतो. पण, तुम्हाला माहित आहे का सलमानच्या प्रत्येक चित्रपटात त्याच्यासोबत एक बॉडी डबल असतो. बॉडी डबल म्हणून परवेज काझी सलमानच्या सिनेमात काम करतो. जो हुबेहूब सलमानसारखा दिसतो. कधी कधी जेव्हा सलमानचा बॅक शॉट किंवा दुसरे काही सीन असतात. जिथे सलमान उपस्थित नसेल तेव्हा तिथे परवेज सलमानचे सीन करतो. 


परवेजने सलमानच्या बॉडी डबल रुपात दबंग २, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो, ट्युबलाइट, टायगर जिंदा है, रेस ३ व भारत या चित्रपटात काम केलं आहे. परवेजने आतापर्यंत सलमानच्या कित्येक चित्रपटातील डेंजर स्टंट्स केले आहेत.


परवेजने काही वेबसाईटना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमानसाठी बॉडी डबल म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तो नेहमी देवाचे आभार मानतो.

तसेच सलमानसारखा चेहरा लाभला आहे, त्याला तो देवाने दिलेलं गिफ्ट मानतो.

याशिवाय परवेजने शाहरूख खानचा प्रदर्शित झालेला चित्रपट झिरोमध्ये सलमान खानच्या केमिओमध्येदेखील काम केलं आहे.  

Web Title: Same to Same ... Salman Khan Body Double Parvez Kazzi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.