प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:14 IST2019-10-07T17:12:04+5:302019-10-07T17:14:35+5:30

विवाह सोहळ्यासाठी तब्बल दहा कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता.

Samantha ruth Prabhu South Indian Superstar Actress Give Reply On Her Pregnancy Latest News Photo Viral | प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून

प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून

तेलगू सुपरस्टार नागार्जुन अक्की नेनीचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा  यांचा धुमधडाक्यात विवाह पार पडला होता. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चाही झाली होती. या शाही विवाह सोहळ्याची एक झलक पाहण्यासाठी सारचे उत्सुक होते.  विवाह सोहळ्यासाठी तब्बल दहा कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. हे  लग्न जितके शाही तितकेच या दोघांचा हनीमून प्लॅनही असाच होता. तब्बल 40 दिवस हे कपल हनीमूनसाठी गेले होते. दोघांची केमिस्ट्रीही खूप चांगली आहे. सोशल मीडियावर यां दोघांचे फोटो  चाहत्यांना कपल गोल देत असतात. 


समंथा आणि  नागा चैतन्य यांच्या फोटोंवर चाहते भरभरून कमेंटस लाईक्सचा वर्षाव तर करत असतात. तर दुसरीकडे समंथाला काही खाजगी प्रश्न विचारत टार्गेटही केले जाते. मात्र ''कुछ तो लोग कहेंगे'' या नुसार समंथाही नेटीझन्सना तिच्याच अंदाजात उत्तर देत असते. मध्यंतरी तिला एका युजरने विचारले होते की,तु प्रेग्नंट आहेस का ? यावर तिने रिप्लाय देत म्हटले होते की, मलाही माहित नाही तुम्हाला कळाल्यास मलाही सांगा.
गेल्या काही दिवसांपासून समंथा गरोदर असल्याच्या चर्चा तमिळ आणि तेलगू सिनेसृष्टीत होत्या. मात्र यावर समंथाने मौन न बाळगता स्पष्टीकरण दिले होते. समंथा आणि नागा यांच्या लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. 

या दोघांची पहिली भेट २००९ मध्ये ‘ये माया चेसाव’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. सामंथाचा हा पहिलाच चित्रपट होता. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्या अगोदर सामंथा रूथ आणि नागा चैतन्य तब्बल सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.  

Web Title: Samantha ruth Prabhu South Indian Superstar Actress Give Reply On Her Pregnancy Latest News Photo Viral