गणितात १०० पैकी १००, पण इंग्रजीत… ; समंथाची दहावीची मार्कशीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:37 IST2023-04-24T12:37:05+5:302023-04-24T12:37:16+5:30

Samantha ruth prabhu: समंथाचे मार्क्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

samantha ruth prabhu 10th marksheet gone viral | गणितात १०० पैकी १००, पण इंग्रजीत… ; समंथाची दहावीची मार्कशीट व्हायरल

गणितात १०० पैकी १००, पण इंग्रजीत… ; समंथाची दहावीची मार्कशीट व्हायरल

आपल्या सौंदर्यामुळे अनेकांच्या मनावर मोहिनी घालणारी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणजे समंथा (Samantha ruth prabhu) . गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. सध्या तिच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असून ती या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. यामध्येच आता तिची १० वीची मार्कशीट व्हायरल झाली आहे.

अभिनयात कुशल असणारी समंथा अभ्यासातही तितकीच हुशार असल्याचं समोर आलं आहे. तिची मार्कशीट व्हायरल झाल्यानंतर ती अभ्यासात टॉप असल्याचं दिसून आलं. 

१० वीत किती होते समंथाला मार्क्स

समंथाला दहावीत ८८७ गुण मिळाले होते. यात गणितात १०० पैकी १००, भौतिकशास्त्रात १०० पैकी ९५ गुण, इंग्रजीमध्ये ९०, वनस्पतीशास्त्रात ८४, इतिहासात ९१ आणि भूगोलात ८३ गुण आणि तमिळ भाषेत ८८ गुण मिळाले होते.

दरम्यान, समंथा शाळेत पहिली आली होती. त्यामुळे तिने यापूर्वी तिची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिची मार्कशीट व्हायरल झाली आहे. अभिनयविश्वात नशीब आजमावणाऱ्या समंथाचा शाकुंतलम हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला.
 

Web Title: samantha ruth prabhu 10th marksheet gone viral