'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, "तुला स्क्रीनवर पाहणं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:03 AM2023-12-01T11:03:19+5:302023-12-01T11:05:36+5:30

सारा खानने 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. हा चित्रपट पाहून सारा खान भारावून गेली आहे.

sam bahadur sara ali khan appretiate vicky kaushal for his best performance in movie shared post | 'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, "तुला स्क्रीनवर पाहणं..."

'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, "तुला स्क्रीनवर पाहणं..."

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला 'सॅम बहादूर' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज(१ डिसेंबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलरमधील विकी कौशलच्या अभिनयाची झलक पाहून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांकडूनही विकीचं कौतुक करण्यात आलं होतं. आता सारा खानने 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

'सॅम बहादूर' चित्रपट पाहून सारा खान भारावून गेली आहे. तिने इन्स्टावर पोस्ट शेअर करत विकी कौशल आणि सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. "तुला स्क्रीनवर पाहणं किती आनंददायी आहे, हे शब्दात मांडता येणार नाही. अगदी सहजपणे तू ही अष्टपैलू, अलौकीक बुद्धिमता भूमिका साकारली आहेस. विकी कौशल आणि सॅम बहादूरच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा... आणखी एक छान कथा मांडल्याबद्दल मेघना गुलजार यांचे आभार.  तुमचं काम आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख तुम्ही या सिनेमात अगदी प्रामाणिकपणे काम केलं आहे," असं साराने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

विकी कौशलबरोबर 'सॅम बहादूर' सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात सान्या मल्होत्राने माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: sam bahadur sara ali khan appretiate vicky kaushal for his best performance in movie shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.