अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीत सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफने लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:09 IST2017-10-14T09:39:39+5:302017-10-14T15:09:39+5:30
कालच आम्ही तुम्हाला सांगितले होते की आमीर खानच्या आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ एका गाण्यासाठी दिसणार आहे. ...
अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीत सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफने लावली हजेरी
क लच आम्ही तुम्हाला सांगितले होते की आमीर खानच्या आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ एका गाण्यासाठी दिसणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार कॅटरिना या चित्रपटामध्ये केवळ एक गाण्यासाठी आहे. हे ऐकून तिचे फॅन्स नक्कीच नाराज झाले असतील. आता कॅटरिना आपले दुःख कोणासोबत शेअर करणार ? असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा एकच नाव समोर येते ते म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान. काल सलमानची बहिण अर्पिता खान शर्माच्या घरी दिवाळी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत कॅटरिना कैफनेसुद्धा हजेरी लावली होती.
![]()
आधी या पार्टी कॅटरिना येणार की नाही अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर असणार होती. ती सलमान खानच्या कुटुंबाच्या सर्व फक्शनला हजेरी लावते. त्यामुळे कॅटरिना येणार नाही अशी चर्चा रंगली होती. कारण आतापर्यंत असे दिसून आले आहे की युलिया असताना कॅटरिना त्याठिकाणी येण्याचे टाळते. मात्र या पार्टी युलिया वंतूरने येणे टाळले. टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेंकाच्या जवळ आल्याची चर्चा होती. त्यामुळे या पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा कॅटरिनावर लागल्या होत्या.
![]()
यापार्टीमध्ये कॅटरिनासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, शिल्पाचा पती राज कुंद्रा, करिश्मा कपूर, कियारा आडवाणी, सोफी चौधरी, दीया मिर्झा, मनीष मल्होत्रा आणि करण जोहरने हजेरी लावली होती.
सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है ख्रिसमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने या चित्रपटाची शूटिंग आबुधाबीमध्ये पूर्ण केली आहे. हा एक था टायगरला सीक्वल आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. सलमान खान आणि कॅटरिनाच्या जोडीचा 'टायगर जिंदा है' कडून दोघांना ही खूप अपेक्षा आहेत.
ALSO READ : केवळ 8 हजारांच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर दिसली कॅटरिना कैफ !