​सलमानच्या ‘ट्युबलाईट’ची शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:56 IST2016-06-26T10:26:32+5:302016-06-26T15:56:32+5:30

‘बजरंगी भाईजान’नंतर कबीर खान आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. विशेष म्हणजे ...

Salman's Tubalite shootings will start next month | ​सलमानच्या ‘ट्युबलाईट’ची शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू

​सलमानच्या ‘ट्युबलाईट’ची शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू

ong>‘बजरंगी भाईजान’नंतर कबीर खान आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाची शुटिंग केवळ पुढच्या २५ दिवसांत सुरू होणार आहे.

याबाबत खुद्द कबीर खानने माहिती दिली की, आजपासून २५ दिवसांनंतर आम्ही सलमानसोबत लडाख येथे शुटिंग सुरू करीत आहोत.

मुख्य हीरोईन कोण असणार याबाबत मात्र त्याने स्पष्ट काही सांगितले नाही. ‘बजरंगी’प्रामाणेच हा सिनेमादेखील राजकीय पार्श्वभूमीवर ‘ह्युमन स्टोरी’ पाहायला मिळणार असल्याचे बोलेले जात आहे.

चित्रपटात बऱ्याच वर्षांनंतर सलमान आपला भाऊ सोहेलसोबत काम करणार आहे. कबीर म्हणतो,कमर्शियल सिनेमा जर चांगल्या कथेवर आधारित असेल तर लोकांना तो जास्त आवडतो. त्यामुळे ‘ट्युबलाईट’देखील याच धरतीवर बनवला जाणार आहे.

Web Title: Salman's Tubalite shootings will start next month